22 November 2024 5:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

निर्भया सामूहिक बलात्कार: नराधमांच्या फाशीला अनिश्चित काळासाठी स्थगिती

Nirbhaya Rape Case, Delhi 2012 Nirbhaya Guilty, Delhi Patiyala Court

नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींना उद्या फाशी देण्यात येणार नाही. त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निर्भया प्रकरणी फाशी आगामी आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या १ फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या चारही दोषींना फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. परंतु दिल्ली कोर्टाने फाशीची शिक्षा पुढे ढकलली आहे.

दोषी आरोपी विनय शर्माने फाशीला स्थगितीची मागणी करणारी याचिका पटियाला हाऊस कोर्टात केली आहे. राष्ट्रपतींकडे दया याचिका प्रलंबित असल्याने, फाशीला स्थगिती द्यावी असं विनय शर्माचं म्हणणं आहे. तर आणखी एक दोषी आरोपी पवनने अल्पवयीन असल्याचं म्हणत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पवनची ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे.

सुनावणीदरम्यान दोषींच्या वकिलाने सांगितले की, दोषींकडे सध्या कायदेशीर उपाय उपलब्ध आहेत. दिल्ली जेल नियमांनुसार फाशी एकत्रच दिली जाते. अशा परिस्थितीत मृत्यूदंडाची वॉरंट अनिश्चित काळासाठी थांबविला पाहिजे. त्याचबरोबर मुकेशच्या वकील वृंदा ग्रोव्हर यांच्या कोर्टातील उपस्थितीवर निर्भयाच्या वकील सीमा कुशवाह आणि सरकारी वकील यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, जेव्हा मुकेशवर सर्व कायदेशीर पर्याय संपले असताना या प्रकरणात आता त्याच्या वकिलाचा कोर्टात या केसशी काहीही संबंध नाही.

निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील आरोपींची पुन्हा एकदा फाशी टळल्याने निर्भयाची आई संतापली असून प्रचंड हताशही झाली आहे. ७ वर्षांपूर्वी माझ्या मुलीवर अत्याचार झाला. सरकार वारंवार मला त्या आरोपींसमोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. परंतु जे काही सध्या सुरू आहे, त्यामुळे आरोपींना बळ मिळत आहे. जर असेच होणार असेल तर आग लावा त्या नियम आणि कायद्यांच्या पुस्तकांना, असा आक्रोश निर्भयाच्या आईने व्यक्त केला.

 

Web Title:  Delhi 2012 Nirbhaya Rape Case Guilty will not be hanged tomorrow.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x