22 January 2025 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई
x

आरे वृक्षतोडीवरून सत्य संदेश देणारी चिमुकली; दिल्लीत ऑक्सिजनची दुकानं सुरु

Delhi Pollution, Save Aarey

दिल्ली: सध्या दिल्लीतील वाढलेल्या प्रचंड प्रदूषणामुळे जगणं देखील कठीण झालं असून, शुद्ध हवा आणि श्वास घेण्यासाठी लोकांना लवकरच ऑक्सिजनच्या दुकानांचा आसरा घ्यावा लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीने स्वतःच हवेत जगण्याचा लोकांच्या अधिकारच संपुष्टात येऊ शकतो. मेट्रो’सारखे प्रकल्प राबवून देखील येथील कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्यावर ताशेरे ओढले आहेत. स्वच्छ हवा आणि ऑक्सिजनच्या बाबतीत वृक्ष महत्वाची भूमिका बजावत असतात हे आपल्या देशात अजून उमगलेलं नाही याचं मोठं उदाहरण म्हणजे मुंबईतील मेट्रो-३च्या निमित्ताने आरे’सारख्या जंगलात हजारो वृक्षांची कर्फ्यू लावून करण्यात आलेला कत्तल.

सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे मेट्रो-३ संबंधित प्रशासकीय अधिकारी या ट्रेनमुळे कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण घटणार असल्याचे डोस सुशिक्षित लोकांना सेमिनार घेऊन पाजत आहेत. मात्र, मुंबईमध्ये अंधेरी-कुर्ला मार्गावर मेट्रो सुरु होऊन ७-८ वर्ष झाली असून, त्याने या पट्यातील कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाणं मोजावं म्हणजे प्रशासकीय दाव्यात किती फसवेगिरी आहे त्याचा प्रत्यय येईल. आज मुंबईमध्ये एवढं मोठं जंगल असताना देखील सरकारी यंत्रणा भविष्याचा विचार करताना दिसत नाहीत. बिल्डरधार्जिन्या योजना सरकार कसं राबवत आहेत याची कल्पना मुंबई शहरातील सुशिक्षित लोकांना देखील नाही आणि अश्विनी भिडे यांनी विले पार्ले सारख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित संस्थांच्या मार्फत मार्गदर्शन शिबिरं भरवत अनेक सुशिक्षित लोकांना कार्बनडाय ऑक्साइडच्या उत्सर्जनावरून मूर्ख बनवलं आहे हे अभ्यासाअंती समोर येईल.

ज्या सुशिक्षितांना आणि निसर्गप्रेमींना मुंबईतील वृक्षतोडीचे दूरगामी परिणाम समजले त्यांना तुरुंगात डांबण्याचा भीष्म पराक्रम सरकारने कर्फ्यू लावून केला आणि एकरात्रीत टोलेजंग वृक्ष मृत केली आणि मुंबईकरांच्या स्वच्छ श्वासाची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ती आंदोलन करणारी तरुण मंडळी आणि केवळ तेच नाही तर तीच तोडली गेलेली वृक्ष लहान मुलांसारखी जपणारी आदिवासी जनता देखील कशी विकासाच्या विरोधात आहेत हे सिद्ध करण्यात सरकार आणि विशेष करून अश्विनी भिडे यशस्वी झाल्या आहेत. अनेक चिमुकल्यांनी देखील मोठे संदेश देणारे देखावे आरेत येथे केले होते, मात्र त्याचा प्रशासनाने खेळ केला होता आणि आज त्यातीलच एका चिमुकलीचा “तो संदेश” देणारा प्रयोग दिल्लीत सत्यात उतरला आहे. कारण, आता दिल्लीत स्वच्छ ऑक्सिजनची दुकानं सुरु होण्यास सुरुवात झाली आहे आणि आज ना उद्या हीच वेळ मुंबईकरांवर देखील येईल, जर सरकारने योग्यवेळीच स्वतःच्या बिल्डरधार्जिण्या ‘अतेरिकी विकासाला’ आळा घातला नाही.

दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी तीन वर्षांतील उच्चांकी नोंदवण्यात आली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) माहितीनुसार राजधानी दिल्लीत २४ तासांतील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) रविवारी दुपारी चार वाजता ४९४ इतका म्हणजेच अतिगंभीर (सीव्हिअर प्लस) होता. या पूर्वी ६ नोव्हेंबर, २०१६ रोजी हा निर्देशांक ४९७ होता. दिल्लीतील ३७पैकी २१ वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रांवर ‘एक्यूआय’ ४९० ते ५०० दरम्यान नोंदवण्यात आला. राजधानी दिल्लीने प्रदूषणाची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असून, अनेकांच्या डोळ्यांना खाज येत आहे.

राजधानी दिल्ली आणि शेजारची राज्ये तीव्र वायूप्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याने तेथील जनजीवन विस्कळीत आणि भयभीत झाले आहे. यंदा गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक वायूप्रदुषणाची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात टिप्पणी केली आहे. दिल्लीत जी परिस्थिती आहे, तशी कोणत्याही सुसंस्कृत देशांमध्ये नसते, जगण्याचा अधिकार सर्वात महत्वाचा आहे.

दिल्लीतील प्रदुषणाच्या समस्येवरून सुप्रीम कोर्टाने पंजाब आणि हरियाणा या राज्यांना देखील शेतातील तण जाळण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, दिल्ली दरवर्षी गुदमरते व आपण काहीच करू शकत नाही आहोत, दरवर्षी अशी परिस्थिती उद्भवते व ती १० ते १५ दिवसांपर्यंत कायम राहते, असे सुसंस्कृत देशात होत नाही.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांची कठोर शब्दांत कानउघाडणी केली आहे. दरवर्षी दिल्लीतलं प्रदूषण वाढतं. मात्र प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काहीच पावलं उचलत नाही, असं म्हणत कोर्टाने नाराजी व्यक्त केली. पंजाब, हरयाणात शेतकरी तण जाळतात. त्यामुळे दिल्लीत प्रचंड प्रदूषण होतं. परंतु, लाखो लोकांचं आयुष्य धोक्यात आणणाऱ्यांवर काय कारवाई केली जाते, असा प्रश्न राऊत यांनी राज्य सरकारांना विचारला.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x