20 November 2024 5:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Vs BHEL Share Price | IRB इन्फ्रा आणि BHEL सहित हे 8 शेअर्स 63% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: BHEL Piccadily Agro Share Price | दारू कंगाल करते, पण दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखाचे झाले 1 कोटी - BOM: 530305 Home Loan | पगारदारांनो, 25 ऐवजी 13 वर्षांत फेडाल गृहकर्ज; पहा झटपट लोन फेडण्याचा सुपर फॉर्म्युला, पैसा वाचवा - Marathi News NMDC Share Price | मल्टिबॅगर शेअरवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर चार्टवर 'ओव्हरसोल्ड', तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Bank Locker | HDFC, SBI आणि ICICI बँक ग्राहकांना 'या' महत्त्वाच्या वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवता येणार नाही, वाचा संपूर्ण डिटेल्स GMP IPO | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधीचा फायदा घ्या - IPO GMP
x

महाराष्ट्र आणि झारखंडच्या दाव्यानंतर शहांचा दिल्लीत व बंगालमध्ये सत्ता येण्याचा दावा

Amit Shah, Delhi Assembly Election, West Bengal Election

नवी दिल्ली: महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये अतिआत्मविश्वास नडल्यानंतर देखील अमित शहांचा शतप्रतिशतचे दावे अजून कमी होताना दिसत नाहीत. महाराष्ट्रात देखील एकटी भाजप १५० चा आकडा पार करून युती २२० पेक्षा अधिक जागा जिंकेल असे छातीठोकपणे सांगत होते. तर दुसरीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष जवळपास नष्ट होऊन, आघाडीला केवळ २० जागा मिळतील असे भीषण दावे भाजपचे नेते करताना दिसले. मात्र राष्ट्रवादीच्या सभांना ग्रामीण भागात मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांना आधीच धास्ती होती आणि मात्र निकाल त्याच धास्तीप्रमाणे लागले आणि आघाडी जवळपास शंभरीच्या घरात पोहोचली. त्यात शिवसेनेने देखील ऐतिहासिक धक्का दिला आणि संपूर्ण गणितच पालटलं.

त्यानंतर झारखंड’मध्ये तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सभांचा सपाटा लावला होता. संपूर्ण झारखंड पिंजून काढत पुन्हा भारतीय जनता पक्ष बहुमताने सत्तेत येणार असा दावा देखील केला होता. मात्र त्याच दिवशी आलेल्या एक्सिट पोलने आधीच धडकी भरवली होती आणि सत्य ठरत झारखंडमध्ये देखील भारतीय जनता पक्षाची दयनीय अवस्था झाली आणि सत्ता गमविण्याची वेळ आली. असं असलं तरी काम करत मतं मागण्यापेक्षा धर्म आणि राष्ट्रीय मुद्यांवरून प्रचार केल्याने, राज्यस्तरीय निवडणुकीत मतदार आपल्याला नाकारतो आहे यावरून अजून भाजपच्या वरिष्ठांची ट्यूबलाईट पेटल्याचं दिसत नाही आणि तेच तंत्र पुन्हा दिल्ली आणि प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत वापरलं जाईल अशी शक्यता अधिक आहे.

पश्चिम बंगालमध्ये तर भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमतात सरकार स्थापन करणार असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. तर बिहारमध्ये भारतीय जनता पक्षा नितीश कुमार यांच्यासोबतच मैदानात उतरणार असंही त्यांनी सांगितले. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात शाह बोलत होते.

अमित शाह यांनी यावेळी अनेक मुद्दे उपस्थित केले. तसेच झारखंडमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी त्यांनी घेतली. झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारने उत्तम काम केले. परंतु, तरी काही बाबतीत आम्ही मागे राहिलो. या पराभवाची समिक्षा होणार आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष शतप्रतिशत सरकार बनवणार असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.

 

Web Title:  Delhi and West Bengal Assembly Election will also have BJPs Power says Union Home Minister Amit Shah.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x