5 January 2025 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या Sarkari Yojana | सरकार देईल कर्ज, स्वतःचा स्टार्टअप सुरू करा, 'या' योजना देतात झटपट लोन, जाणून घ्या सविस्तर SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या
x

दिल्लीत ३ पेक्षा जास्त जागा हा आमचा विजयच; राज्यात भाजप १२२ वरून १०५ वर आला आहे

Delhi Assembly Election 2020, BJP Maharashtra President Chandrakant Patil

मुंबई: दिल्लीत अरविंद केजरीवाल ‘वॉल’ बनून उभे ठाकले असून ‘आप’च्या झाडूपुढे भारतीय जनता पक्ष व काँग्रेसचा पुन्हा एकदा सफाया झाल्याचे आतापर्यंतच्या मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे. या निकालांवर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला दोष देत ३ पेक्षा एकजरी जागा जास्त जिंकली तरी भारतीय जनता पक्षासाठी हा विजयच आहे, असं म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, दिल्लीच स्पष्ट विश्लेषण असं आहे की, भारतीय जनता पक्षाला देशभर एकटं पाडण्यासाठी वाटेल ती तडजोड करून सर्व एकत्र येत आहेत. महाराष्ट्र हे त्याचं मोठं उदाहरण आहे. ज्या दिल्लीत १५ वर्षे काँग्रेसनं राज्य केलं, त्याच काँग्रेसला चार टक्के मतं पडत आहेत. ही जी काँग्रेसची मतं दुसरीकडे वळाली त्यामध्ये आमचा पराभव म्हणता येणार नाही.

तत्पूर्वी, दिल्ली विधानसभा जिंकण्याचा पण करून भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. मुख्यमंत्री पदाचा कोणताही चेहरा न देता भारतीय जनता पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. ही झारखंड आणि महाराष्ट्रात आलेल्या अपयशानंतर भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासूनच भारतीय जनता पक्षानं तयारी सुरू केली होती.

 

Web Title: Delhi Assembly Election 2020 BJP Maharashtra President Chandrakant Patil blames congress for vote shift.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x