22 November 2024 3:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

शेतकरी आंदोलन | संत बाबा राम सिंह यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Delhi border farmers protest, Sant Baba Ram Singh, commits suicide, Shooting himself

नवी दिल्ली, १६ डिसेंबर: नवीन कृषि कायद्याविरोधात (New Farm Laws) सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत (Delhi Farmer Protest) मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली-हरियाणा बॉर्डर (Sindhu Border) वर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्यासाठी आलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबा राम सिंह यांना जखमी अवस्थेत एका खासगी रुग्णालात भरती करण्यात आलं होतं. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. Delhi border farmers protest Sant Baba Ram Singh commits suicide by shooting himself.

सांगितले जात आहे की संत बाबा रामसिंग हरियाणामधील करनाल येथे राहणारे होते. ट्विटर वापरकर्त्यांनी बाबांनी लिहिलेली सुसाइड नोटही पोस्ट केली आहे. असा दावा केला जात आहे की या सुसाईड नोटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळीचा आणि शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याविषयी उल्लेख केला आहे.

दरम्यान या घटनेपूर्वी, कुंडली सीमेवर केंद्राच्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील भिंडर कला या गावचे रहिवासी असलेले मक्खन खान (४२) आपले सहकारी बलकार आणि इतरांसह तीन दिवसांपूर्वी कुंडली सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

 

News English Summary: Sant Baba Ram Singh, who was involved in the agitation on the Singhu Border on the Delhi-Haryana border, shot himself on Wednesday. He was rushed to a private hospital in critical condition. There the doctors pronounced him dead. Baba Ram Singh was a resident of Karnal. A note written before his suicide was also found. In it, Baba Ram Singh has mentioned the Farmers Protest.

News English Title: Delhi border farmers protest Sant Baba Ram Singh commits suicide by shooting himself news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x