VIDEO | मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी विधानसभेत कृषी कायद्यांची प्रत फाडली
नवी दिल्ली, १७ डिसेंबर: दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन (Delhi Border Farmers Protest ) सुरू आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली. आता दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal ) यांनी शेतकऱ्यांना समर्थन देत कृषी कायद्यांच्या (New Farm Act) प्रति टराटरा फाडल्या. तसंच केंद्र सरकारवर निशाणा साधला.
आणखी किती बळी घेणार हा प्रश्न विचारत संतापलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कृषी कायद्याची प्रत दिल्लीच्या विधानसभेत फाडली. दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कृषी कायद्यांवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कडाडून टीका केली. “शेतकऱ्यांच्या आंदोलनात आत्तापर्यंत २० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. आपल्या देशातला शेतकरी हा भगत सिंह यांच्या प्रमाणे कायद्यांविरोधात आंदोलन करतो आहे. त्यामुळे मोदी सरकारने आता इंग्रजांपेक्षाही जास्त वाईटपणा करु नये” असं म्हणत या कायद्यांवरुन अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
किसान नहीं, भाजपा भ्रमित हैं।#KejriwalAgainstFarmBills pic.twitter.com/chnaqyLotV
— AAP (@AamAadmiParty) December 17, 2020
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही केजरीवालांनी निशाणा साधला. “आदित्यनाथ यांनी बरेली येथील रॅलीमध्ये लोकांना कृषी कायद्याचे फायदे सांगत होते. तुमची जमीन जाणार नाही, बाजार बंद होणार नाही असं सांगत होते. पण या कायद्याने फायदा काय होणार आहे ते भाजपवाल्यांनी सांगावं. देशात कुठेही शेतकऱ्यांना माल विकता येईल हा एकच रेटा भाजपवाले लावत आहेत”, असं केजरीवाल म्हणाले.
News English Summary: Asked how many more victims, Chief Minister Arvind Kejriwal tore up a copy of the Agriculture Act in the Delhi Assembly. In a special session of the Delhi Legislative Assembly, Chief Minister Arvind Kejriwal sharply criticized the Agriculture Act. “So far more than 20 farmers have been martyred in the farmers’ agitation. In our country, a farmer like Bhagat Singh is agitating against the law.
News English Title: Delhi Chief Minister Arvind Kejriwal tore copy of new agriculture act in Delhi assembly news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER