23 February 2025 9:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई महानगरपालिकेच्या कोरोनासंबंधित चांगल्या नियोजनाची आठवण, दिल्लीला सल्ला

Maharashtra corona pandemic

नवी दिल्ली, ५ मे | देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरुच आहे. अशावेळी काही राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतोय. त्याचबरोबर व्हेटिलेटर्सही कमी पडत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी आणि आजही ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. ‘देशात जी स्थिती आहे. ती पाहून तुम्ही आंधळे बनू शकता, आम्ही नाही. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही. केंद्राने तर डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, पण आम्ही तसं करु शकत नाही’, अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत मुंबई महानगर पालिकेच्या स्तुत्य उपाय योजनांचा देखील उल्लेख करण्यात आला. यावेळी न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, “आम्ही जे काही प्रसार माध्यमांमध्ये पाहतो ते पहाता, मुंबई महानगरपालिकेने कोरोना संबंधित उपाययोजनांवर काही उल्लेखनीय काम केले आहे आणि आम्ही दिल्लीचा अनादर करत नाही, परंतु बीएमसीने नेमकं काय केले ते आपण पाहू घ्यावं. कारण महाराष्ट्रात देखील ऑक्सिजन पुरवठा करावा लागतोय हे देखील दुसरं वास्तव आहे’, असं न्यायाधीशांनी म्हटल्याने सत्ताधारी शिवसेनेची मान नक्कीच उंचावणार आहे.

 

News English Summary: What we see in media, Bombay Municipal Corporation has done some remarkable work and not disrespecting Delhi but we can maybe see what was done by BMC. Maharashtra is also an oxygen supply state said Justice Chandrachud.

News English Title: Supreme court highlight the good work done by BMC during corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x