25 December 2024 11:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन रुग्णालयात दाखल, ताप व श्वसनास त्रास

Delhi Health Minister Satyendra Jain, admitted in hospital, covid 19

नवी दिल्ली, १६ जून : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आणि श्वसनासाठी होत असलेल्या त्रासाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सत्येंद्र जैन यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली.

विशेष म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन सतत बैठकांना उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. त्या बैठकीत सत्येंद्र जैन आरोग्यमंत्री म्हणून उपस्थित होते.

अचानक श्वास घेण्यात होत असलेल्या त्रासामुळे तसंच जास्त ताप आल्याच्या कारणास्तव दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी रात्री त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण अचानक कमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

 

News English Summary: Delhi Health Minister Satyendra Jain has been admitted to hospital. He has been admitted to hospital after complaining of fever and respiratory distress. Satyendra Jain informed about this through Twitter.

News English Title: Delhi Health Minister Satyendra Jain has been admitted to hospital covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x