23 February 2025 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार
x

भारतीयांमध्ये कोरोनाशी लढायची प्रतिकारशक्ती आपोआप निर्माण झालेली असू शकते - डॉ. रणदीप गुलेरिया

Delhi, Mumbai, Ahemdabad, Covid peak, AIIMS, Dr Randeep Guleria

नवी दिल्ली, २० जुलै : जगभरात थैमान घालत असलेलं करोना संकट कधी टळणार? हा प्रश्न पडलेल्या नागरिकांची चिंता वाढावी अशीच आकडेवारी आज समोर आली आहे. भारतात करोनाचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच दिवसभरात इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील २४ तासांत देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे करोनाबाधित आढळले असून, ६८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ११ लाख १८ हजार ०४३ वर पोहचली आहे.

३ लाख ९० हजार ४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर आतापर्यंत सात लाखांपेक्षा जास्त जणांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत २७ हजार ४९७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

आता खरोखरच देशात या साथीचा कहर झालाय का आणि आता तरी आलेख सर्वोच्च टोकावर आहे असं म्हणता येईल का? (Covid pandemic peak) याबद्दल विचारलं असता अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मुंबई, अहमदाबादमध्ये हे टोक येऊन गेलंय असं म्हणायला वाव असल्याचं सांगितलं.

रणदीप गुलेरिया यांनी सोमवारी कोरोनाची साथ, प्रतिकारशक्ती, लस (COVID Vaccine) यासंदर्भात माहिती द्यायला माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी भारतात या साथीच्या उद्रेकानं टोक गाठलंय आणि आता साथ उतरणीला लागणार का असं विचारता ते म्हणाले, “काही भागांत कोविडने सर्वोच्च शिखर गाठलंय असं म्हणता येईल. दिल्ली, मध्य मुंबई, अहमदाबाद या भागात साथीचा आलेख थोडा उतरणीला लागला आहे. देशात इतरत्रही साथीने सर्वोच्च टोक गाठून झालेलं असल्याची शक्यता आहे.”

भारतीयांमध्ये कोरोना विषाणूशी लढायची प्रतिकारशक्ती आपोआप निर्माण झालेली असू शतते. कारण कोरोना व्हायरस मुळे होणारे मृत्यू तुलनात्मक कमी झाले आहेत. देशातल्या काही भागात संसर्ग पसरायचा वेगही कमी आहे. म्हणजेच तिथल्या लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे, असं म्हणता येईल.

 

News English Summary: Randeep Guleria said that in some areas, it can be said that Kovid has reached the highest peak. Outbreaks appear to be exacerbated in Delhi, central Mumbai and Ahmedabad. Elsewhere in the country, the outbreak is likely to reach its peak.

News English Title: Delhi Mumbai Ahemdabad may have reached Covid peak AIIMS director Dr Randeep Guleria on corona immunity News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x