5 February 2025 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या
x

आप आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार, कार्यकर्ता ठार

AAP Party MLA Attack

नवी दिल्ली: आम आदमी पार्टीचे महरौली येथील आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. यादव जेव्हा मंदिरातून दर्शन घेऊन परतत होते, तेव्हा त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते अशोक मान यांचा मृत्यू , तर अन्य एकजण जखमी झाला आहे. याप्रकऱणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नरेश यादव हे महरौली मतदारसंघातून काल पुन्हा निवडून आले आहेत. दिल्लीमध्ये भाजपाला टक्कर देत आप’ने सत्ता राखली असून काँग्रेस, भाजपाचा दारुण पराभव केला आहे. यादव हे निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यांसह मंदिरातून घरी परतत होते. यावेळी किशनगढमध्ये त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. आपने या हल्ल्याला दिल्लीच्या पोलिसांना जबाबदार धरले आहे.

अशोक मान (वय ४५)असं मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी या घटनेची माहिती ट्विटरद्वारे दिली. गोळीबारात आणखी एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोन्ही कार्यकर्ते यादव यांच्यासोबत होते. ते सर्वजण मंदिरातून परतत असताना हा हल्ला झाला. या प्रकरणी किशनगढ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

 

 

Web Title:  Delhi Shots fired at AAM Aadmi Party Mehrauli MLA Naresh Yadav convoy.

हॅशटॅग्स

#Kejariwal(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x