20 April 2025 10:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप

India corona pandemic

दिल्ली, १४ मे | दिल्लीची दैनंदिन प्राणवायूची गरज ७०० मेट्रिक टनावरून ५८२ मेट्रिक टनावर आली असल्याने अतिरिक्त प्राणवायू अन्य राज्यांना उपलब्ध करून द्यावा, असे पत्र दिल्ली सरकारने केंद्र सरकारला पाठविले आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे गेल्या २४ तासांत १० हजार ४०० जणांना करोनाची लागण झाल्याने शहरातील सकारात्मकतेचे प्रमाण १४ टक्क्यांवर आले आहे, असेही सिसोदिया म्हणाले. सध्या कोविड-१९ रुग्णालयांमध्ये आता अधिक खाटा उपलब्ध आहेत आणि प्राणवायूच्या मागणीतही घट झाली आहे, असे सिसोदिया यांनी आभासी पत्रकार परिषदेत सांगितले.

दुसरीकडे मागील राजधानी दिल्लीत युथ काँग्रेसने सामान्य लोकांच्या मदतीसाठी कॉल सेंटर सुरु केलं असून मागील काही महिन्यांपासून लोकांना जेवण, ऑक्सिजन आणि इतर शक्य मदती घरपोच देत आहेत. परिणामी दिल्ली युथ काँग्रेसचे अध्यक्ष बी श्रीनिवास यांची त्यांच्या मदतकार्यामुळे लोकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

एकीकडे दिल्लीतील भाजप राजकारण करण्यात व्यस्त असलं तरी दिल्लीतील युथ काँग्रेस कार्यकर्ते लोकांच्या मनात स्थान निर्माण करत आहेत. परिणामी आज दिल्लीचे पोलीस जे केंद्राच्या हातात गेले आहेत, त्यांनी आता बी श्रीनिवास यांची क्राईम ब्रांच मार्फत चौकशी सुरु केली आहे. स्थानिक पत्रकार देखील त्यांच्या मदत कार्याचे दाखले देत आहेत. त्यामुळे संपूर्ण काँग्रेस पक्षातून संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

 

News English Summary: Though the BJP in Delhi is busy with politics, the Youth Congress workers in Delhi are making a place in the minds of the people. As a result, the Delhi Police, which is now in the hands of the Center, has now launched an inquiry into B Srinivas through the Crime Branch. Local journalists are also giving evidence of their relief work. So there is outrage from the entire Congress party.

News English Title: Delhi Youth congress president B Sriniwas is enquired by Delhi crime branch team over corona related help to common peoples news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या