16 April 2025 9:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनात नाहीत | फडणवीसांचा हिंदी माध्यमांवरून खोटा प्रचार

Devendra Fadnavis, Maharashtra farmers, Delhi farmers protest

नाशिक, २२ डिसेंबर: दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शेतकरी रवाना झाला आहे. महाराष्ट्रभरातील २१ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा या वाहन मोर्चात सहभाग आहे.सभेआधी सोमवारी हे शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे एकत्रित झाले होते.यावेळी किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले यांनी मार्गदर्शन केलं.

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात राज्यभरातील हजारो शेतकरी सोमवारी नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावर जमत इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उद्योजक, भांडवलदारशाही विरोधातही घोषणाबाजी करीत मोदी व शाह यांच्या पोस्टरचे दहन करण्यात आले. यात सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, महाड, मुंबई ठाणे यासह विविध जिल्ह्यांतून सुमारे ३ हजार शेतकरी व कामगारांनी सहभाग नोंदवला. या शेतकऱ्यांनी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या नेतृत्वात आणि केरळचे खासदार के. के. रागेश यांच्या प्रमुख उपस्थित दिल्लीकडे प्रस्थान केले.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून निघालेल्या शेतकरी मोर्चाचा पहिला मुक्काम चांदवडला होणार असून मंगळवारी (दि. २२) सकाळी चांदवडवरून पुन्हा दिल्लीच्या दिशेने मोर्चाचे प्रस्थान होणार आहे. यात उमराणे, मालेगाव असा प्रवास करून मोर्चेकरी धुळ्यात दाखल होतील. या प्रवासात ठिकठिकाणी विविध पक्ष व संघटना दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या शेतकरी मोर्चातील वाहनांच्या ताफ्याचे स्वागत करणार असून दुसऱ्या दिवसाचा मुक्काम शिरपूर येथे होणार आहे. त्यानंतर बुधवारी (दि. २३) तिसऱ्या दिवशी मोर्चेकऱ्यांच्या वाहनांचा हा ताफा मध्य प्रदेश, राजस्थान असा प्रवास करीत दिल्लीकडे मार्गक्रमण करणार असून शिरपूरपर्यंत यात सुमारे ५०० कामगारही सहभागी होणार आहे.

एकाबाजूला हिंदी प्रसार माध्यमांवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयी असं चित्र निर्माण करताना दुसऱ्या बाजूला राज्यातून दिल्लीतील आंदोलन बळ नये म्हणून राज्यातील भाजप नेते कामाला लागले आहेत. त्याचाच भाग म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीसुद्धा दिल्लीत जाऊन केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी राळेगणसिद्धीत जाऊन आण्णांशी चर्चा केली. अण्णांच्या आंदोलनाची भारतीय जनता पक्षाने धास्ती घेतल्यानेच या भेटी सुरू केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

दरम्यान काल राळेगणसिद्धीमध्ये पंजाबचे शेतकरी अण्णांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी अण्णांशी चर्चा केली. यावेळी अण्णांनी शेतकरी आंदोलनाला आपला आधीपासूनचं पाठिंबा असल्याचं सांगतानाच आंदोलकांना बळ देण्यासाठी दिल्लीत येऊन आंदोलन करण्याचे आश्वासनही दिलं होतं. अण्णांनी दिल्लीत आंदोलन केल्यास हे आंदोलन आणखी तापून देशभरातील शेतकरी त्यात सामील होण्याची भीती असल्यानेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अण्णांची भेट घेण्यास सुरुवात केल्याचं कळतय.

 

News English Summary: Thousands of farmers have left Maharashtra to participate in the farmers’ agitation in Delhi. Farmers from 21 districts across Maharashtra are participating in this vehicle march. Before the meeting, these farmers had gathered at Golf Club Ground in Nashik on Monday. Ashok Dhawale, Dr. Guided by Ajit Navale.

News English Title: Devendra Fadnavis talked on news channels about Maharashtra farmers support to Delhi farmers protest news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या