29 April 2025 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

२ मई दाढ़ी गयी | प. बंगालच्या निकालावरून कुणाल कामराचं खोचक ट्विट

Kunal Kamra

मुंबई, ०२ मे | पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार? आज हे चित्र स्पष्ट होईल. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून करोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकीकडे करोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नाही. राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून ८० टक्के मतदान झालं आहे.

ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देणार का हे पहावं लागणार आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवं आव्हान निर्माण केलं आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारात भाजपने ‘२ मई दीदी गयी’ या टॅगलाईनचा मोठ्या प्रमाणावर वापर करत ममतांची सत्ता पालटण्यासाठी समाज माध्यमांवर हवानिर्मिती केली होती. मात्र प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी उलटं चित्र दिसू लागल्याने स्टॅन्डउप कॉमेडियन कुणाल कामराने एक खोचक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. कुणाल कामराने ट्विट करताना म्हटलं आहे की, “२ मई दाढ़ी गयी!”

 

News English Summary: In the election campaign, the BJP used the tagline ‘Do Mai Didi Gayi’ extensively and created a stir on social media to change Mamata’s power. However, on the day of the actual verdict, the opposite picture appeared and stand-up comedian Kunal Kamara sent a scathing tweet to Prime Minister Narendra Modi. Kunal Kamra tweeted, “Do Mai Dadi Gayi!”

News English Title: Do Mai Daadi Gai tweeted by Kunal Kamra over West Bengal Assembly Election 2021 result news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#KunalKamra(5)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या