22 November 2024 5:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोनाचा एकत्रित सामना केल्याने देशात कोरोनाचा मृत्यूदर कमी - पंतप्रधान

PM Narendra Modi, Viajay Divas, Corona Virus, Covid 19

नवी दिल्ली, २६ जुलै : आज देशात २१ वा कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. दरम्यान, आज मन की बात च्या ६७ व्या भागात देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमधील योद्ध्यांना मानवंदना दिली. तसेच युद्धकाळातील वर्तनाबाबत देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमध्ये म्हणाले की, युद्धकालीन परिस्थितीमध्ये आम्ही जे काही बोलतो त्याचा सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटंबीयांच्या मनोधैर्यावर थेट प्रभाव पडत असतो. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आमचे वर्तन, आमचा व्यवहार, आमची वाणी, आमची विधाने, आमच्या मर्यादा आणि आमचे लक्ष्य या सर्वामध्ये आपण जे काही करत आहोत त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढले पाहिजे. तसेच त्यांच्या सन्मान वाढला पाहिजे.

युद्ध फक्त सीमवेरच नाही तर देशांअतर्गत देखील लढलं जातं. मागील काही दिवसांपासून देशाने एकत्र येत कोरोनाचा सामना केला आहे. त्यामुळे आपल्याकडे कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे. भारत आपल्या लाखो देशवासियांचा जीवन वाचवण्यात यशस्वी झाली आहे. कोरोना अजूनही तितकाच घातक आहे. चेहऱ्यावर मास्क लावणं, सोशल डिस्टंसिंग, हात धुवणे, महत्त्वाचं आहे. कोरोनाचा सामना करताना डॉक्टर्सचा विचार करा. मास्कचा त्रास झाला आणि तो काढून टाकायचा विचार येत असेल तर डॉक्टरांचं स्मरण करा.

आव्हानं आली पण लोकांनी त्याचा सामना ही केला. सकारात्मकतेने संकटाला संधीमध्ये रुपांतर करता येतं. देशात याची वेगवेगळी उदाहरणं पाहायला मिळत आहेत. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी कच्छ आणि लद्दाख काम करत आहे. दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी हे 14 वी मन की बात करत आहेत. तर २०१४ पासूनचा ही 67 वी ‘मन की बात’ आहे.

 

News English Summary: Over the past few days, the country has faced corona coming together. So we have a lower corona mortality rate. India has succeeded in saving the lives of millions of our countrymen. The corona is still just as deadly.

News English Title: Do not make statements that will affect the morale of the soldiers during the war PM Narendra Modi appealed News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x