28 January 2025 9:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

कृपया घाबरू नका आणि ऑक्सिजन व कोरोना संबंधित औषधे जमा करून ठेवू नका - डॉ. रणदीप गुलेरिया

Dr Randeep Guleria

नवी दिल्ली, २६ एप्रिल: देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.

देशामध्ये ऍक्टिव्ह केस म्हणजे उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात 28 लाख 7 हजार 333 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे सर्वच विषयावरून रुग्णांना पैसे मोजावे लागत आहेत. त्यात रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्याला ऑक्सिजन आणि कोरोना संबंधित औषधं लागणारच असल्याने आधीच त्यासाठी पाठपुरावा आणि साठवण केल्याचे प्रकार देखील समोर येतं आहेत. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजन कसा काय लागू लागला आहे असं देखील प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

याच विषयाला नुसरून एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी प्रसार माध्यमांना संबोधित करताना त्यांनी आवर्जून म्हटलं आहे की, “कृपया घाबरू नका आणि ऑक्सिजन तसेच कोरोना संबंधित औषधे जमा करून ठेवू नका, अशी कळकळीची विनंती केली आहे.

 

News English Summary: Following the same subject, the director of AIIMS, Dr. Randeep Guleria has held a press conference. Addressing the media at this time, he said that, ‘urges people to not panic and refrain themselves from hoarding oxygen and medicines.

News English Title: Dr Randeep Guleria a Director of AIIMS urges people to not panic and refrain themselves from hoarding oxygen and medicines news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x