22 February 2025 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

आधी हजारो कोटीची, आता गुजरातमध्ये ३५० कोटीची ड्रग्ज सापडली | पाकिस्तानी ड्रग सप्लायरसाठी सेफ लोकेशन?

Drugs worth Rs 300 crore seized in Gujarat Dwarka

मुंबई, 11 नोव्हेंबर | गुजरातच्या द्वारकेत साडे तीनशे कोटीचं ड्रग्ज सापडल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला घेरलेलं असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ड्रग्जचा संपूर्ण खेळ गुजरातमधून तर सुरू नाही ना? असा सवाल नवाब मलिक (Drugs worth Rs 300 crore seized in Gujarat Dwarka) यांनी केला.

Drugs worth Rs 300 crore seized in Gujarat Dwarka. Police in Gujarat’s Devbhumi Dwarka district seized banned narcotic substances, whose value is expected to be over Rs 300 crore :

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन द्वारकेत सापडलेल्या ड्रग्जवरून भाजपला घेरलं आहे. द्वारकात साडेतीनशे कोटीचे ड्रग्ज पकडले आहे. मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी आणि सुनील पाटील हे सर्व जण अहमदाबादच्या नोवाटल आणि फाईव्ह स्टार हॉटेलात होते. गुजरातच्या मंत्र्यासोबत त्यांचे फोटो आहेत. हे लोक गुजरातमधून ड्रग्ज रॅकेट ऑपरेट करत आहेत, असं सांगतानाच ड्रग्जचा खेळ गुजरातमधून तर सुरू नाही ना? असा सवाल मलिक यांनी केला आहे.

गुजरातमध्ये दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडलं आहे. त्यात मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी आणि सुनील पाटील यांचं या प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का? याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी काल बर्नाड शॉचा सुविचार पोस्ट करून मला प्राण्याची उपमा दिली. त्यात काही नवीन नाही. भाजपचे नेते असेही लोकांना कुत्रे, मांजर म्हणत असतात. यातून त्यांची संस्कृती दिसून येते. ते लोकांना माणूस म्हणून वागवत नाहीत हेच स्पष्ट होतं, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Drugs worth Rs 300 crore seized in Gujarat Dwarka district.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x