22 January 2025 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

बेरोजगारीने तरुणांच्या आत्महत्या | सामान्यांची घरं उध्वस्त | गुंतवलं कंगनाच्या घरात

Job loss, Youngsters suicide, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १० सप्टेंबर : सध्या देशात एकमेव घर किंवा कार्यालय आहे, ज्याची समस्त भारतात चर्चा सुरु आहे. त्या वास्तूवर हातोडा पडल्याने किती लोकं बेरोजगार झाले याची आकडेवारी समोर असली तरी देशातील बेरोजगारी भीषण स्थतीत आहे याबाबत शंका नाही. अगदी भारत सरकारच्या CMIE’ने जाहीर केलेल्या आकडेवारीत सर्व समोर आलं आहे.

२०१३ मध्ये देशाची अर्थव्यवस्था भयानक स्थितीत असून तरुणांना रोजगार हवा असल्याची आठवण करून देणारे देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशातील अराजकतेवरून शांत आहेत. त्यांना ना रोजगारावर बोलूसं वाटत, ना अर्थव्यवस्थेवर आणि त्यातून सामान्य नागरिक जागृत होऊ नयेत म्हणून आगामी काळात कंगना किंवा तत्सम सेलिब्रिटींच्या घरात सामान्यांना गुंतवलं जाईल. जेणे करून नोकरी गेल्याने उद्धस्त होणाऱ्या सामान्य लोकांच्या घरांची चर्चा सुरु होऊ नये.

भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांमधील खाजगीकारामुळे अनेकजण बेरोजगार होणार आहेत यात शंका नाही आणि त्यामुळे सरकारी कर्मचारी संघटनांमध्ये केंद्र सरकार विरोधात खदखद वाढली आहे. मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण करणे तर सोडा, सध्या ऐकून देखील घेतल्या जातं नाहीत असा संघटनांचा आरोप आहे.

पहिल्या तिमाहीतील भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराची आकडेवारी समोर आल्यानंतर विकासदर जवळपास उणे २४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वात निचांकी घसरण आहे. याबाबत विरोधकांनी आधीच इशारा देऊन सरकारला उपाय योजना करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र मोदी सांगतील ती पूर्व दिशा असं सध्याचं देशातील राजकारण असल्याने सूचनांना काहीच महत्व उरलेलं नाही.

कोरोनाच्या काळात अनेकांची नोकरी गेली तर काहीजणांना नोकरीवरून काढणार असल्याची टांगती टलवार कायम आहे. आजच कोरोनाच्या काळात नोकरीवरून काढल्यानं तरुणानं आपलं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई विमानतळावर ट्रॉली सुपरवाझरचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. नोकरीवरून काढल्यामुळे नैराश्येतून या तरुणानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. ही घटना मुंबईतील साकीनाका परिसरात घडली आहे. विनायक खंदारे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.

एकाबाजूला आज १० सप्टेंबर म्हणजे #आत्महत्यारोकथामदिवस आहे आणि दुसऱ्या बाजूला देशात तरुणाईमध्ये बेरोजगारीवरून आत्महत्यांचं प्रमाण वाढून त्यांची घरं उध्वस्त होतं आहेत. जोपर्यंत बेरोजगारीची कुऱ्हाड प्रसार माध्यमांवर पडणार नाही आणि पत्रकार बेरोजगारीमुळे घरी बसणार नाहीत तोपर्यंत देशातील वास्तव लोकांच्या नजरेसमोर आणलं जाणार नाही. त्यामुळेच संपूर्ण देश कंगना किंवा तत्सम सेलिब्रिटींच्या घरांमध्ये गुंतवून ठेवला जाईल. कारण कंगना तर सुरुवात आहे आणि यापुढे काही महिने केवळ सेलिब्रिटींचं माध्यमांच्या केंद्रस्थानी असतील असंच काहीस वातावरण आहे.

 

News English Summary: India’s overall unemployment rate was recorded at 9.1 per cent on the week ending August 16, a significant jump from 8.67 per cent recorded a week ago on August 9, according to industry think-tank Centre for Monitoring Indian Economy (CMIE). The latest unemployment rate jumped to nine-week high, with the urban and rural unemployment rate rising to 9.61 per cent and 8.86 per cent, respectively.

News English Title: Due to job loss many youngsters suicide in India Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x