11 January 2025 11:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

भारताचं आत्मनिर्भर सोशल मीडिया ऍप; उपराष्ट्रपतींच्या हस्ते लॉन्चिंग

Elyments App, Social media app, Vice president of India M Venkaiah Naidu

नवी दिल्ली, ५ जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती कोविंद यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांची माहिती देत त्यावर चर्चा केली. आज (रविवार) सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधान मोदी राष्ट्रपती भवनात पोहचले होते.

दुसरीकडे, उपराष्‍ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही एक महत्वाचे ट्विट केले आहे, यात “भारत इतिहासाच्या एका नाजूक वळणावरून जात आहे. आपण एकाच वेळी अनेक दहशतवादी आणि देशाबाहेरील आव्हानांचा सामना करत आहोत. मात्र आपल्याला जी आव्हानं दिली जात आहेत, त्याचां सामना करण्यासाठी आपण दृढ निश्‍चयी असायला हवे,” असे म्हणण्यात आले आहे.

दरम्यान, देशात सोशल मीडिया युजर्सची संख्या ५० कोटीहून अधिक आहे. सोशल मीडिया मार्केटमध्ये विदेशी कंपन्या अधिकाधिक आहेत. मात्र आता भारताचं एक देसी ऍप लॉन्च करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्याहस्ते रविवारी भारतातील पहिलं देसी सोशल मीडिया ऍप Elyments लॉन्च केलं आहे.

सोशल मीडियावर डेटा प्रायव्हसीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. त्यामुळे या देसी सोशल मीडिया ऍपमध्ये डेटा प्रायव्हसीबाबत अधिक लक्षकेंद्रीत करण्यात आलं आहे. Elyments ऍपमध्ये यूजरचा डेटा सुरक्षित राहणार असून कोणाच्याही परवानगीशिवाय तिसरी पार्टी डेटा घेऊ शकत नसल्याचं, सांगण्यात आलं आहे. Elyments ऍप गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करता येऊ शकतं. हे ऍप लाखहून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं आहे. हे ऍप 8 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यात ऑडिओ, व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा देण्यात आली आहे.

 

News English Summary: An Indian desi app has been launched. Vice President Venkaiah Naidu on Sunday launched India’s first desi social media app Elyments.

News English Title: Elyments first Indian social media app launched by vice president of India M Venkaiah Naidu News latest Updates.

हॅशटॅग्स

#SocialMediaApp(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x