29 April 2025 4:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

केजरीवाल सरकारकडून सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Universities Exams cancelled, Delhi deputy CM Manish Sisodiya, Corona Virus

नवी दिल्ली, ११ जुलै : महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केली आहे. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, या निर्णयाला राहुल गांधी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. याविषयाला अनुसरून राहुल गांची यांनी म्हटलं आहे की, “कोरोना आपत्तीत परीक्षा घेणं चुकीचं आहे. मागील वर्षाच्या कामगिरीवर विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. दरम्यान मनुष्यबळ विकास आणि UGC च्या या निर्णयावर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील टीका केली आहे.

दुसरीकडे कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील सर्व विद्यापीठांच्या आणि अंतिम वर्षांच्या परीक्षा यंदा रद्द करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ठरवलेल्या मापदंडानुसार पदवी परीक्षेचे गुण दिले जातील, अशी घोषणा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज येथे केली. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या राज्यातील इतर विद्यापीठांच्याही परीक्षा रद्द कराव्यात, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

News English Summary: In a fresh plea, Delhi chief minister Arvind Kejriwal on Saturday sought Prime Minister Narendra Modi’s intervention to cancel upcoming final year exam of Delhi University and other central government universities.

News English Title: Exams cancelled in all Universities in Delhi deputy CM Manish Sisodiya declared News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Kejariwal(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या