5 November 2024 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

होय एका प्रशिक्षण हॉलचं रुपांतर रुग्णालयात करण्यात आलं..पण - लष्कराचा खुलासा

Fact Check, PM Narendra Modi, Army Hospital

नवी दिल्ली, ४ जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अचानक कुशॉक बाकुला रिमपोची विमानतळावर दाखल झाले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण पंतप्रधान मोदी लेहमध्ये दाखल होईपर्यंत त्यांच्या दौऱ्याबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. प्रसारमाध्यमांनाही मोदींच्या या दौऱ्याबद्दल कुठलीही पूर्वकल्पना नव्हती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा लेह दौरा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला. कारण मोदींच्या दौऱ्यानंतर सर्वच माध्यमांवर याच बातम्या झळकू लागल्या होत्या. विशेष म्हणजे याच दौऱ्यावर असताना त्यांनी गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या हिंसक झटापटीत जखमी झालेल्या जवानांची इस्पितळ भेट घेतली होती. मात्र त्याच इस्पितळातील भेटीची सध्या समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे.

मोदींनी ज्या इस्पितळाला भेट दिली ते इस्पितळ नसून सेमिनार हॉल असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला आहे. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे ज्या जखमी जवानांची मोदींनी इस्पितळात भेट घेतली होती, त्या इस्पितळात जवान बैठे बैठे सावधान पोझिशनमध्ये होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या इस्पितळातील फोटो समोर आल्यावर ते नेमकं इस्पितळंच होतं का असा प्रश्न समाज माध्यमांवर विचारला जाऊ लागला आहे. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर या भेटीवरुनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपाला ट्रोल केलं जाऊ लागलं. एवढंच नाही तर #MunnaBhaiMBBS हा ट्रेंडही आला. यानंतर आता खुद्द लष्कराने पत्रक काढून यावर खुलासा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लडाख येथील रुग्णालयात ३ जुलै रोजी आले होते. मात्र सोशल मीडियावर यावरुन काही टीका होताना दिसते आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जे काही आरोप करण्यात येत आहेत ते दुर्दवी आहेत असंही लष्कराने म्हटलं आहे.

सध्या करोनाचं संकट देशावर आहे. त्यानुसारच लेह येथील सामान्य रुग्णालयात काही बदल करण्यात आले आहेत. एका प्रशिक्षण हॉलचं रुपांतर रुग्णालय विभागात करण्यात आलं आहे. त्यावरुनही जे काही बोललं गेलं त्यापेक्षा मोठी दुर्भाग्याची गोष्ट काय? असंही लष्कराने म्हटलं आहे. गलवान खोऱ्यात जे सैनिक जखमी झाले त्यांना करोनाची बाधा होऊ नये म्हणून या ठिकाणी वेगळ्या कक्षात ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी नेहमी व्हिडीओ ऑडिओ प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या हॉलचं वेगळ्या रुग्ण कक्षेत रुपांतर करण्यात आलं आहे असंही लष्कराने त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे.

 

News English Summary: From this visit on social media, Prime Minister Narendra Modi and the BJP started being trolled. Not only that, but the trend #MunnaBhaiMBBS also came. After this, the army itself has taken out a leaflet and revealed this.

News English Title: Fact Check Did Modi Visit The Hospital Or Not Army Press Release Says News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x