21 April 2025 1:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

फेसबुक-ट्विटर 'फेक' अकाउंट्स, खोट्या राजकीय 'हवा' निर्मितीसाठी?

BJP, Loksabha Election 2019

मुंबई : २०१४ पासून समाज माध्यमांवरील अभ्यासातून असे उजेडात येत आहे की, ट्विटर आणि फेसबुकवरील ‘फेक फॉलोअर्स’ अकाउंट्स त्यांच्या राजकीय नेत्याची प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच विरोधी नेत्याबद्दल दूषित वातावरण निर्मिती करण्यासाठी शिस्तबद्ध वापरली जात आहेत. काही दिवसांपूवीच ट्विटरने अधिकृतपणे भारतातील तसेच जगातील सर्वच राजकारण्यांच्या ‘फेक’ फॉलोअर्सचे आकडे घोषित केले होते.

ट्विटर फेक फॉलोअर्सच्या बाबतीत भारतात टक्केवारीत राहुल गांधी पुढे असले तरी त्यांच्या एकूण फॉलोर्सचा आकडा मोदींपेक्षा फारच कमी आहे. मोदींच्या एकूण ४ कोटी फॉलोअर्स पैकी तब्बल ६० टक्के म्हणजे चक्क २ कोटी ४० लाख फॉलोअर्स हे फेक अकाउंट्स म्हणजे ‘फेक फॉलोअर्स’ आहेत. फेक फॉलोअर्सच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगातील राजकारण्यांच्या पुढे असल्याचे अधिकृत आकडेवारीत स्पष्ट झालं आहे.

फेसबुक ने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात तब्बल २० कोटी फेसबुक अकाउंट्स फेक आहेत. फेसबुकने केलेल्या अधिकृत पाहणीत भारतात सर्वाधिक फेक अकाउंट्स असल्याचे उघड झाले आहे. भारतापाठोपाठ फिलिपाइन्स आणि इंडोनेशिया सारख्या विकसनशील देशांचा क्रमांक लागतो. भारतात फेक फॉलोअर्स आणि त्यांच्या गलिच्छ भाषेचं प्रमाण इतक वाढलं आहे की भारतातील फेसबुक वापरणाऱ्या स्त्रियांनी फेसबुकवरून काढता पाय घेतला आहे हे फेसबुकच्याच एका रिसर्च मधून बाहेर आलं आहे. परंतु प्रश्न हाच उरतो की इतके फेक अकाउंट्स म्हणजे ‘फेक फॉलोअर्स’ नेमक करतात काय त्यांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

जर आपण २०१४ पासूनच्या नवीन सरकारचा अभ्यास केला तर असे समजेल की समाज माध्यमांवरील राजकीय रणनीती किती खोलवर पसरली होती.

नेमका काय उद्धेश असतो ‘फेक अकाउंटचा’ समाज माध्यमांवर ?

१. ज्या नेत्याला फॉलो करण्यासाठी ते फेक अकाउंट बनविले असते, त्याने समाज माध्यमांवर कोणतीही प्रतिक्रया नोंदविल्यास त्यावर ‘लाईक्स आणि लव्ह’ चा वर्षाव करणे तसेच होकारात्मक कमेंट्स करणे. तसेच एखाद्याने नकारात्मक प्रतिक्रिया दिलीच तर त्याच्यावर गलिच्छ भाषेत प्रतिक्रिया देणे आणि तुम्हाला या देशाची काहीच पडलेली नाही अशा असभ्य प्रतिक्रिया देऊन त्रस्त करणे.

२. तुम्ही एखाद्या राजकीय विषयावर फेसबुक किंवा ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आणि ती प्रतिक्रिया जर त्या फेक अकाउंट वापरणाऱ्याच्या नेत्याच्या बाजूने असली कि त्यावर ‘लाईक्स आणि लव्ह’ चा वर्षाव करणे. जर नकारात्मक असेल तर तुम्ही कसे चुकीचे आहात हे दाखवणे. इतर नेत्यांच्या विरुद्ध धार्मिक आणि अश्लील टिपणी करणे, विरोधकांच्या समर्थकांचा संबंध थेट पाकिस्तानशी किंवा दहशदवाद्यांशी जोडणे आणि त्यापुढे म्हणजे तुमच्यासारखी लोक आहेत म्हणून देश प्रगती करू शकत नाही, अशी विकृत प्रतिकिया देणे अशी ‘महान’ कर्तव्य हि फेक अकाउंट्स बजावत असतात.

३. विरोधी नेत्यांचे एडिटेड फोटो किंव्हा व्हिडिओ समाज माध्यमांवर जास्तीत जास्त प्रसारित करणे. शक्यतो अशा फेक प्रोफाईलचे फोटो हे देवीदेवतांची, धार्मिक किंवा प्रतिष्ठित व्यक्तींचेच दिसतात आणि स्वतःचं कोणतंही खरं अस्तित्व त्या प्रोफाईलवर उघड करत नाहीत.

४. विरोधी पक्षातील नेत्याला फॉलो करून त्यांच्या विरोधी प्रतिक्रिया देणे तसेच स्वतः फॉलो करत असलेला नेता कसा महान आहे हे पटवून देणे आणि दुसऱ्या विरोधी नेत्याच्या फॉलोअर्समध्ये संभ्रम निर्माण करणे. फेक फॉलोअर्स हा त्या नेत्याचा चाहता असतोच असं नाही, तर तो विरोधी नेत्याच्या अधिकृत अकाउंट वरील हालचाली टिपण्यासाठी त्याला फॉलो करत असतो.

समाज माध्यमांवरील या फेक अकाउंट्सवरून प्रति मिनिटाला इतके व्हिडीओ आणि फोटो शेअर होत आहेत की एक दिवस फेसबुक हे ‘डिजिटल ग्लोबल डम्पिंग ग्राउंड’ होईल अशीच काहीशी स्थिती निर्माण होत आहे. चीन सारख्या बलाढ्य देशात फेसबुक आणि युट्युबला बंदी असण्याचं सुरक्षेप्रमाणेच ते सुद्धा एक प्रमुख कारण असावं.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या