24 November 2024 8:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

कडाक्याच्या थंडीत गंमत म्हणून आंदोलन करत नाही | कायदा रद्द करा | आंदोलन सुरूच राहणार

Famers protest, Farm bills

नवी दिल्ली, २५ डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण आणि कृषी मंत्रालयाच्या सचिवांनी पाठवलेल्या चिठ्ठीनंतर, रणनीती ठरवण्यासाठी शनिवारी किसान संयुक्त मोर्चाने बैठकीचं आयोजन केलं आहे. पंतप्रधानांनी किसान सन्मान योजनेच्या (Prime Minister Kisan Samman Yojana ) सातव्या हप्त्याचं वितरण केलं. यावेळी मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिल्लीतील आंदोलनावर भाष्य केलं. “काही राजकीय पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. कोणतेही मुद्दे असतील तर चर्चेला या, मात्र माथी भडकवू नका” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, आंदोलन करणारे शेतकरी कोणाच्याही आहारी गेलेले नाहीत. विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या संघटनांना भडकविलेले नाही,’ असे सांगून क्रांतिकारी किसान युनियनचे नेते डॉ. दर्शनपालसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दावे फेटाळून लावले.

पंतप्रधानांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना भारतीय किसान युनियनचे नेते जगमोहन सिंग म्हणाले, “केंद्र सरकार ऐकत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. शेतकरी कडाक्याच्या थंडीत गंमत म्हणून आंदोलन करत नाहीत, तर ती त्यांची अपरिहार्यता आहे. पंतप्रधानांच्या भाषणावरुन सरकारला कृषी कायदे रद्द करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट होते.” वादग्रस्त शेती कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला शुक्रवारी महिना पूर्ण झाला.

 

News English Summary: The agitating farmers have not gone on anyone’s diet. Opposition parties have not provoked the farmers ‘unions,’ said Krantikari Kisan Union leader Dr. Darshanpal Singh rejected the claims of Prime Minister Narendra Modi. Reacting to the Prime Minister’s speech, Jagmohan Singh, leader of the Indian Farmers’ Union, said, “The agitation will continue till the central government listens. Farmers are not agitating as a joke in the bitter cold, it is their inevitability.

News English Title: Famers protest will not stop until farm bills will not cancel news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x