2 February 2025 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांनो, ही SBI म्युच्युअल फंड योजना महिना 3500 रुपये SIP वर देईल 2 कोटी रुपये परतावा New Income Tax Slab | 12 लाख ते 50 लाख रुपये उत्पन्नावर किती टॅक्स भरावा लागेल आणि बचत किती होईल जाणून घ्या Smart Investment | तुमचा महिना पगार कितीही असला तरी 'या' 3 पर्यायांमध्ये पैसे गुंतवा, कधीच आर्थिक कोंडी होणार नाही 5G Smartphone | स्मार्टफोन प्रेमींनो 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा बजेट तयार ठेवा, कोणते नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार CIBIL Score | 'या' 6 सोप्या स्टेप्समुळे तुमचा सिबिल स्कोर भराभर वाढवेल, 500 हून थेट 800 चा आकडा गाठेल, असं शक्य होइल Home Loan EMI | वयाच्या 40 व्या वर्षी गृहकर्ज घेण्याचा प्लॅन करताय, मग, या 4 गोष्टी लक्षात ठेवा, कर्जाचा डोंगर हलका होईल Mutual Fund SIP | 50 लाखांचे घर खरेदी करताय, मग किती रुपयांची SIP करावी लागेल, मोठी रक्कम कशी मिळेल पहा
x

समाज माध्यमांवरील ऑनलाइन समुदायांच्या द्वेष आणि गुंडगिरीवर रतन टाटांची पोस्ट

Ratan Tata, Social Media, online community

मुंबई, २१ जून : समाज माध्यमांवर एकमेकांवर विखारी टिपणी आणि द्वेष वाढविणाऱ्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. समाज माध्यमांवरील सामान्य वापरकर्ते, सेलिब्रिटी, उद्योजक, राजकारणी अगदी महिला देखील अशा विखारी टीका टिपणीच्या बळी पडत आहेत. यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर फेक अकाउंट बनवून कोणालाही लक्ष करण्याचा प्रकार नवा राहिलेला नाही.

समाज माध्यमांवर होणाऱ्या विखारी टीका टिपणीला कंटाळून मोठ्या सेलिब्रिटींनी त्यांची अकाउंट डिऍक्टिव्हेट करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान याच समाज माध्यमांवरील धुमाकुळावरून आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ऑनलाइन समुदाय एकमेकांसाठी हानिकारक होत आहे आणि एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे, असे रतन टाटा यांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

🤍

A post shared by Ratan Tata (@ratantata) on

“हे वर्ष कोणत्या-ना-कोणत्या स्तरावर प्रत्येकासाठी आव्हानांनी भरलेले आहे. ऑनलाइन समुदाय एकमेकांसाठी हानिकारक होत असल्याचे दिसून येत आहे. लोक लगेच प्रतिक्रिया देऊन एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे रतन टाटा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याचबरोबर, रतन टाटा म्हणाले, “माझे मते, यावर्षी विशेषत: आपण सर्वांनी ऐक्य आणि मदत करणे आवश्यक आहे आणि एकमेकांना कमी लेखण्याची ही वेळ नाही.”

याशिवाय, एकमेकांच्या प्रति अधिक संवेदनशीलतेचा आग्रह करत अधिक दयाळूपणा, अधिक समज आणि धैर्याची आवश्यकता असल्याचे रतन टाटा यांनी पुन्हा एकदा सांगितले. ते म्हणाले, “माझी ऑनलाइन उपस्थिती मर्यादित आहे, परंतु मला आशा आहे की, हे प्रामाणिकपणाचे स्थान म्हणून विकसित होईल आणि द्वेष आणि गुंडगिरीऐवजी याठिकाणी प्रत्येकाला समर्थन मिळेल.”

 

News English Summary: Famous industrialist Ratan Tata has posted a post on social media platform Instagram. In this post, Ratan Tata says that the online community is becoming detrimental to each other and trying to write less of each other.

News English Title: Famous industrialist Ratan Tata has posted a post on social media platform Instagram regarding online community News latest Updates.

हॅशटॅग्स

#Ratan Tata(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x