22 November 2024 12:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

गाझीपूर बॉर्डर | राऊतांच्या भेटीनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भूमिका स्पष्ट केली

Farmer leader Rakesh Tikait, Shivsena, MP Sanjay Raut

नवी दिल्ली, ०२ फेब्रुवारी: नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचं स्वरुप दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. भारतीय किसान युनिअनने नव्या कृषी कायद्यांसंबंधी देशभरात जागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपण देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन मोहीम राबवणार असल्याचं भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी जाहीर केलेलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूर बॉर्डरवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच या ठिकाणी ठेवण्यात आलेला पोलिसांचा फौजफाटा पाहून या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा संताप व्यक्त केला. आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांचे जे मृत्यू झाले. ते शेतकऱ्यांचे मृत्यू नसून या शेतकऱ्यांच्या हत्याच आहेत, असा घणाघाती आरोपही शिवसेनेने केला आहे.

दरम्यान, शिवसेना नेत्यांच्या भेटीनंतर राकेश टिकैत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘विरोधक आम्हाला पाठिंबा देण्यास येत असल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही. पण त्याचं राजकारण होऊ नये,’ असं टिकैत म्हणाले. ‘राजकीय नेते आमच्या भेटीसाठी येत असल्यास त्याला आम्ही काहीही करू शकत नाही. या भागातील वाहतुकीची समस्या पोलिसांनी केलेल्या बॅराकेडिंगमुळे निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांनी वाहतूक रोखून धरलेली नाही,’ असं टिकैत यांनी म्हटलं.

 

New English Summary: After meeting Shiv Sena leaders, Rakesh Tikait clarified their role. ‘We have no problem if the opposition comes to support us. But it should not be politics, ‘said Tikait. ‘If a political leader comes to visit us, we can do nothing for him. The traffic problem in the area is due to barricading by the police. The farmers have not stopped the traffic, ‘said Rakesh Tikait.

News English Title: Farmer leader Rakesh Tikait clear his stand after meet with Shivsena MP Sanjay Raut news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x