22 November 2024 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

तेलंगणा: मोदींविरोधात मैदानात उतरलेल्या २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज बाद

Telangana, Farmers, Narendra Modi, Loksabha Election 2019

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या तेलंगणाच्या तब्बल २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. निवडणूक आयोगाने एका शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे. आयोगाने ज्या एकमेव शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे त्यांचं नाव इस्तारी सुन्नम नरसईया असं आहे.

नरेंद्र मोदींविरोधात एकूण ११९ शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामधील ८९ शेतकऱ्यांचा अर्ज आधीच रद्द करण्यात आला होता. यानंतर निजामाबादमधील ५५ आणि तामिळनाडूमधील ४० शेतकऱ्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता, पण अखेर निजामाबादमधील २५ आणि तामिळनाडूमधील पाच शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निजामाबादमधील २५ उमेदवारांपैकी २४ उमेदवारांचे अर्ज गुरुवारी रद्द करण्यात आले. वाराणसीत उपस्थित निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

याआधी तेलंगणामध्ये निजामाबाद लोकसभा मतदारसंघातून ११७ शेतकऱ्यांनी सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीविरोधात (टीआरएस) निवडणूक लढवली होती. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी अर्ज आल्याने मतदानादिवशी निवडणूक आयोगासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर अतिरिक्त ईव्हीएम मशीन आणल्या होत्या. याशिवाय मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात करण्यात आलं होतं.

नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून २०१४ लोकसभा निवडणूक लढवली होती. मोठ्या अंतराने नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. मोदींविरोधात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्येही ते मोदींविरोधात लढले होते. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडलं असून २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x