15 January 2025 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

शेतकऱ्यांना मोदी-शाह सारखे मध्यस्थ नकोयत | शेतकरी थेट अंबानी-अदानींशी बोलतील

Farmers, Middle men, Modi and Shah, Prashant Bhushan

नवी दिल्ली, ११ डिसेंबर: केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. पंजाब आणि हरियाणासह इतर राज्यातील हजारो शेतकरी दिल्ली सीमेवर मोठ्या संख्येने जमले आहेत. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकरी आंदोलन आणि नवीन कृषी कायद्याबाबत पत्रकार परिषद घेतली, त्याला उत्तर म्हणून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलनस्थळावरून पत्रकार परिषद घेऊन शेतकर्‍यांच्या वतीने प्रतिक्रिया दिली.

राकेश टिकैट म्हणाले की, ‘आम्ही कृषिमंत्र्यांचे ऐकत होतो … त्यांनी काही सुद्धा नवीन सांगितले नाही. त्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या आम्हाला मान्य नाहीत. एमएसपी दिल्याशिवाय आम्ही येथून सोडणार नाही. हा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी लावून धरली आहे.

आपल्या पत्रकार परिषदेदरम्यान राकेश टिकैत म्हणाले की एमएसपी लागू करण्याची मागणी आम्ही केली होती, पण सरकारने ती पूर्ण केली नाही. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना हेच हवे आहे. या सरकारच्या कार्यकाळात स्वामीनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणीही झालेली नाही. टिकैट म्हणाले की, जर सरकार 80 टक्के बदल करण्यास तयार असेल तर हे कायदे किती वाईट आहेत हे आपल्याला समजू शकेल. सरकारच्या सर्व मंत्र्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

एकीकडे सरकार स्वतः योग्य असल्याचं सांगत शेतकरी आंदोलकांना दोष देत आहेत दुसरीकडे केंद्र सरकार हट्टीपणा दाखवत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर देखील शेतकरी समर्थक आणि केंद्र सरकार सर्मथक असे दोन गट पडल्याचे पाहायला मिळते आहे. त्यात एक टीका प्रसिद्ध ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्विटवरुन केली आहे.

बुधवारी शेतकऱ्यांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर प्रशांत भूषण यांनी एक फोटो शेअर करत, “शेतकऱ्यांनाही मोदी आणि शाह यांच्यासारखी मध्यस्थ (मिडल मॅन) नकोयत,” असा टोला लगावला आहे. प्रशांत यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये “शेतकरी थेट अंबानी-अदानींशी बोलतील. त्यांना मिडल मॅनची गरज नाही,” असा मजकूर लिहीला आहे.

 

News English Summary: After the farmers rejected the government’s proposal on Wednesday, Prashant Bhushan shared a photo saying, “Farmers don’t want a middle man like Modi and Shah.” In the photo shared by Prashant, “Farmers will talk directly to Ambani-Adani. They don’t need a middle man, “the text reads.

News English Title: Farmers do not need middle men like Modi and Shah said Prashant Bhushan tweet news updates.

हॅशटॅग्स

#Mukesh Ambani(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x