30 April 2025 8:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

शेतकऱ्यांचे प्रश्न अन अजब पाठपुरावा; एक भेटले केंद्रीय गृहमंत्र्यांना तर दुसरे दळणवळन मंत्र्यांना

Congress MP Ahmed Patel, Nitin Gadkari, Amit Shah, Devendra Fadnavis

मुंबई: सध्या राज्यात ओल्या दुष्काळाने थैमान घातले असून, आधीच दुष्काळात होरपळला शेतकरी राजा आता ओल्या दुष्काळाने हैराण झाला आहे. एका बाजूला शेतकरी मदतीच्या आशेने हंबरडा फोडत असताना राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांच्या भेटीगाठी म्हणजे कशाचा कशाला पत्ता नाही असंच म्हणावं लागेल.

सध्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी २५ हजार कोटींची मागली केली जात असल्याने केंद्राकडून देखील मोठ्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. त्याअनुषंगाने देशाचे पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री किंवा केंद्रीय अर्थमंत्री यांच्या भेटीगाठी घेणे गरजेचे आहे. मात्र महाराष्ट्रातील राजकीय हालचाली पाहता दोन्ही बाजूचे नेते मंडळी कोणाचीही भेट घेऊन त्याचा संदर्भ थेट शेतकऱ्यांशी जोडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि प्रसार माध्यमांनी भेटीचे कारण विचारताच फडणवीसांनी सदर भेटीचे कारण शेतकरी आणि ओला दुष्काळाच्या मदतीच्या संदर्भात भेट घेतल्याचं उत्तर दिलं. मात्र त्यांचा दावा प्रशासकीय पातळीवरील पाठपुराव्याच्या बाबतीत हास्यास्पद असल्याची टीका होऊ लागली आहे. कारण त्यानंतर मुख्यमंत्री ना केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे मुख्य सचिव किंवा केंद्रीय अर्थमंत्र्यांना देखील भेटल्याचं पाहायला मिळालं नाही, ज्यामुळे फडणवीसांवर विश्वास ठेवता येईल. वास्तविक केंद्राने पावसाळ्यापूर्वी राज्यात आलेल्या दुष्काळावर मदत न करता ती देखील अजून हवेत आहे. त्यालाच अनुसरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविणारं ट्विट केलं आहे.

गडकरींची भेट घेतल्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पटेल यांनी भेटीमगील कारण स्पष्ट केलं. “मी शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी नितीन गडकरींची भेट घेतली. ही राजकीय बैठक नव्हती. महाराष्ट्रातील राजकारणावर या बैठकीमध्ये चर्चा झाली नाही,” असं पटेल यांनी सांगितलं. विशेष म्हणजे ओल्यादुष्काळाची सर्वाधिक झळ विदर्भ आणि मराठवाड्यादेखील लागलेली असताना, त्याच विदर्भातील नेत्यांना म्हणजे नितीन गडकरींना गुजरातमधून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जाणाऱ्या अहमद पटेल यांना आठवण करून द्यावी लागत असेल तर कठीण आहे. त्यामुळे आपण शेतकऱ्यांसाठी किती झटतो आहोत आणि आम्हाला सत्ताकारणात काहीच रस नाही असं दाखवण्याच्या केविलवाणा प्रयत्न सध्या दोन्ही बाजूचे करताना दिसत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या