22 November 2024 5:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

काही लोकांनी देश ताब्यात घेतलाय, त्यांचा जनता, व्यापारी, शेतकरी आणि मजुरांशी काही संबंध नाही - राकेश टिकैत

Farmers leader Rakesh Tikait

नवी दिल्ली, ०१ जुलै | मागील ७ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये वारंवार शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. दिल्लीतील गाझीपूर बॉर्डरवर आज आंदोलक शेतकरी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूने दगडफेक देखील करण्यात आल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, येथील परिस्थिती एवढी बिघडली की, भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या गाडीला तेथून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. यादरम्यान, आंदोलक शेतकरी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये हाणामारी झाली. या प्रकारानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भारतीय जनता पक्षावर अनेक गंभीर आरोप लावले. भारतीय जनता पक्षाचे नेते आमच्या मंचावर आले होते. तसेच ते त्यांच्या नेत्याचे स्वागत करत होते, ही बाब चुकीची होती, असे राकेश टिकैत म्हणाले.

शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, आंदोलनाचा मंच रस्त्यावर आहे याचा अर्थ असा नाही की, कुणीही मंचावर यावं. मंचावर यायचं असेल तर भाजपा सोडून या. परंतु, आम्ही गाझीपूरच्या मंचावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवून कब्जा केला, असे दाखवणे चुकीचे आहे. अशा लोकांना धडा शिकवला जाईल. ते प्रदेशात पुन्हा कुठेही जाऊ शकत नाहीत. हे लक्षात ठेवा.

राकेश टिकैत ट्विट करून म्हणाले की, “सध्या काही लोकांनी देश ताब्यात घेतला आहे, त्यांचा देशातील जनता, व्यापारी, शेतकरी आणि मजुरांशी काही संबंध नाही. आश्चर्याची बाब म्हणजे देशाच्या राजधानीच्या भोवती शेतकरी बसले आहेत आणि सरकार काहीच बोलत नाही. शेतकरी देखील मागे हटणार नाहीत, असं ठणकावलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Farmers leader Rakesh Tikait criticized Modi govt after attack on protesting farmers at Gazipur border news updates.

हॅशटॅग्स

#RakeshTikait(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x