3 December 2024 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

शेतकरी आंदोलनामुळे नव्हे तर निवडणुकीतील मोदी-शहांच्या रॅलीमुळे कोरोनाचा फैलाव वाढला - राकेश टिकैत

Rakesh Tikait

कोलकत्ता, ०९ जून | शेतकरी नेते राकेश टिकैत सध्या पश्चिम बंगालमध्ये असून त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनाचं स्वरुप, बंगालमधल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर पत्रकारांशी राकेश टिकैत यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली.

शेतकरी आंदोलनामुळे कोरोनाचा फैलाव वाढतोय असं वाटत नाही का, असा प्रश्न टिकैत यांना विचारण्यात आला. तेव्हा आम्ही मोठी मिटींग घेतली नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा प्रश्नच नाही. आम्ही सगळेजण करोना नियमांचं पालन करुन आंदोलन करत आहोत. पश्चिम बंगाल निवडणुकांच्या कालावधीत कोरोनाचा भरपूर फैलाव झाला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि अमित शाह यांच्या रॅली, बैठका झाल्या आणि त्यामुळे कोरोनाच आणखीनच पसरला, असा आरोप करत ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढवणार आहेत, याची मला कल्पना नव्हती, असा दावा देखील टिकैत यांनी केला आहे.

तुम्हीही ममता यांच्या प्रचारात सहभागी होता, असे विचारल्यावर टिकैत म्हणाले की, आम्ही प्रचार केला म्हणूनच आम्ही त्यांच्यासमोर आमच्या मागण्या मांडत आहोत. आम्हाला असे वाटत आहे की, विरोधी पक्षांनी आमच्या सोबत यावे आणि केंद्र सरकारवर शेतकरी कायद्यासंदर्भात दबाव टाकावा, अशी अपेक्षा टिकैत यांनी व्यक्त केली.

 

News English Summary: Farmer leader Rakesh Tikait is currently in West Bengal where he met Chief Minister Mamata Banerjee. During the visit, the nature of the farmers’ movement, the problems of the farmers in Bengal and their issues were discussed. After this, Rakesh Tikait interacted with the journalists. This time, he strongly criticized Union Home Minister Amit Shah.

News English Title: Farmers leader Rakesh Tikait criticized Modi Shah over corona spread in country news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x