21 April 2025 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL
x

मी शेतकरी आहे, फकीर नाही जो झोळी उचलून चालू पडेन | मोदींना सणसणीत टोला

Farmers leader Rakesh Tikait, PM Narendra Modi, Farmers protest

नवी दिल्ली, २९ जानेवारी: मागील दोन महिन्यांपासून शांततेत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारीला हिंसक वळण लागलं आणि विषय सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर उत्तर प्रदेश आणि केंद्रातील मोदी सरकारने प्रशासकीय पातळीवर संपूर्ण आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी आंदोलक असलेल्या ठिकाणी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना मॅनेज करून स्थानिकांचा शेतकऱ्यांना विरोध असल्याचं भासविण्यात आलं. वास्तविक हीच स्थानिक लोकं मागील दोन महिने शेतकऱ्यांना पाणी आणि खाण्यापिण्याची सोय करत होते.

शेतकरी नेत्यांवर FIR करून त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याची देखील रणनीती आखण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यासाठी पोलिसांना थेट राकेश टिकैत यांच्याकडे पाठवून आंदोलन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र राकेश टिकैत यांनी केलेल्या भावुक भाषणानंतर संपूर्ण वातावरण पुन्हा पलटू लागल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये राकेश टिकैत यांनी देखील मोदींना सणसणीत टोला लगावला आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाची धार काहीशी कमी होताना दिसत होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना हटवून सीमा मोकळ्या करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आंदोलन संपणार अशी शक्यता वर्तवली जात होती. गाझीपूर सीमेवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झाला. त्यांनी तंबू, शौचालयं हटवण्याचं काम सुरू केलं. भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकेत यांनी आंदोलन संपवत असल्याचे संकेत दिले.

रात्री उशिरा पोलिसांनी टिकेत यांना समजवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांनी आंदोलनस्थळ सोडण्यास नकार दिला. माध्यमांशी संवाद साधताना टिकेत यांना अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांसोबत विश्वासघात झाला आहे. तिन्ही कायदे मागे न घेतल्यास आत्महत्या करेन, असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर टिकेत यांनी उपोषण सुरू केलं. यानंतर आंदोलनस्थळावरील परिस्थिती बदलली. राकेश टिकेत यांचे बंधू नरेश टिकेत यांनी आंदोलन संपणार नसल्याची घोषणा मुझफ्फरपूरमध्ये केली.

 

News English Summary: Late at night, the police tried to convince Tiket. However, he refused to leave the protest site. Tiket burst into tears while interacting with the media. Farmers have been betrayed. He warned that he would commit suicide if the three laws were not repealed. After that, Tiket started fasting. After this, the situation at the agitation site changed. Rakesh Tiket’s brother Naresh Tiket announced in Muzaffarpur that the agitation would not end.

News English Title: Farmers leader Rakesh Tikait slams PM Narendra Modi indirectly over farmers protest issue news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या