5 February 2025 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259
x

देशभरात शेतकरी मोर्चे काढणार | गुजरातला केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार - राकेश टिकैत

Farmers march, Whole India, Rakesh Tikait, Modi Govt

नवी दिल्ली, १३ फेब्रुवारी: दिल्लीच्या वेशींवरील आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी होत असून केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या तर आंदोलन थांबेल, अन्यथा शेतकरी घरी जाणार नाही, असा इशारा ‘भारतीय किसान युनियन’चे प्रवक्ते आणि आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी दिला.

नवे कायदे रद्द करा आणि किमान आधारभूत मूल्याचा कायदा करा, मग शेती क्षेत्रातील दीर्घकालीन प्रश्नांवर समिती नेमा, अशी सूचनाही टिकैत यांनी केली. गेले दोन महिने सुरू असलेल्या आंदोलनाचा राजकीय वापर होऊ दिलेला नाही. केंद्रात सत्ताबदल करणे, हा आंदोलनाचा हेतू नसल्याचेही टिकैत यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

दरम्यान, राकेश टिकैत यांनी एक मोठी घोषणा केली. राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच थेट केंद्र सरकारलाच आव्हान दिलं आहे. “देशभरात मार्च काढणार आणि गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार” असं म्हणत राकेश टिकैत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. (Farmers march will be arrange in whole India said Farmers leader Rakesh Tikait)

प्रसार माध्यमांच्या हाती आलेल्या वृत्तानुसार, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने हरियाणाच्या बहादूरगडमध्ये किसान महापंचायत आयोजित करण्यात आली होती. यात देशभरात मार्च काढण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली. गुजरातला मुक्त करू. कारण गुजरात हे केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे. भारत स्वतंत्र आहे. पण गुजरातमधील जनता ही कैदेत आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना तुरूंगात टाकलं जात आहे असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे. तसेच त्यांनी गुजरातमध्ये जाण्याची तारीख अजून निश्चित करण्यात आली नसल्याचं देखील म्हटलं आहे. या आंदोलनाचं राजकारम करून नका असंही टिकैत यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: We will march nation-wide, go to Gujarat and set it free. It’s controlled by Centre. India is free but people of Gujarat are imprisoned. If they want to join the movement, they are jailed. We are deciding on the date said BKU leader Rakesh Tikait during Mahapanchayat in Bahadurgarh.

News English Title: Farmers march will be arrange in whole India said Farmers leader Rakesh Tikait news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x