20 April 2025 10:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

माओवादी, नक्षल शक्ती शेतकरी आंदोलन चालवत आहेत | RTI उत्तरातून पियुष गोयल तोंडघशी

farmers movement, Maoists and Naxalites, Piyush Goyal

मुंबई, १० जानेवारी: दिल्लामध्ये मागील दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी हे शेतकरी करत आहेत. मात्र केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेक फेऱ्यामधील चर्चा होऊनही या आंदोलनावर तोडगा निघू शकलेला नाही.

याच शेतकरी आंदोलवरून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी अत्यंत गंभीर आरोप केले होते. जर शेतकरी आंदोलनाने माओवादी आणि नक्षल शक्तींशी फारकत घेतली तर शेतकऱ्यांना सरकारचं म्हणणं लक्षात येईल, असं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं होतं आणि हे कायदे देशाच्या हिताचे असल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात येईल, असं त्यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं होतं. यानंतरही त्यांच्या मनात काही शंका असल्यास भारत सरकारचे दरवाजे शेतकऱ्यांसाठी खुले असून प्रत्येक मुद्दा आणि तरतुदीविषयी चर्चा व्हायला हवी, असं त्यांनी म्हटलं होतं.

केवळ एका गोष्टीबद्दल बोलून उठायचं, अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टीवरचा तोडगा निघू शकत नाही, हे आंदोलन आता शेतकऱ्यांच्या हातातून निघून त्यांच्या माओवादी आणि नक्षल शक्ती आंदोलन चालवत आहेत,” असा धक्कादायक आरोप पीयूष गोयल यांनी केला होता.

यासंदर्भात साकेत गोखले यांनी थेट केंद्रीय गृह मंत्रालयाकडून माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारून पियुष गोयल यांचा आरोप खरा आहे का याबाबत विचारणा केली होती. त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरात संबंधित आरोप खोटा असल्याचं म्हटलं असून पियुष गोयल खोटे आरोप करत असल्याचं सत्य समोर आलं आहे.

 

 

News English Summary: Union Railway Minister Piyush Goyal had made very serious allegations about the farmers’ agitation. Railway Minister Piyush Goyal had said that if the farmers’ movement parted ways with the Maoists and Naxalites, the farmers would realise what the government was saying and the farmers would realise that the laws were in the interest of the country, he told ANI. Even after this, if there is any doubt in his mind, the doors of the Indian government are open to the farmers and every issue and provision should be discussed, he had said.

News English Title: farmers movement parted ways with the Maoists and Naxalites said minister Piyush Goyal news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PiyushGoyal(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या