5 November 2024 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News
x

कृषि विधेयक | मोदी सरकार विरोधात भाजपशासित राज्यातही भडका | शेतकरी रस्त्यावर

Farmers protest, Agricultural bills, Punjab Haryana, Marathi News ABP Maza

चंदीगड, २० सप्टेंबर : राज्यसभेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात कृषीविषयक विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. आवाजी मतदान घेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी या दोन विधेयकांना मंजुरी देण्यात आली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत विधेयकं मांडली होती. विरोधकांकडून सभागृहात विधेयकांचा विरोध करत गोंधळ घालण्यात आला. वेलसमोर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोबतच विधेयकाची प्रत हिसकावण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र या सर्व गदारोळात आवाजी मतदान घेत विधेयकं मंजूर करण्यात आली.

दुसरीकडे मात्र, करोनाकाळातही पंजाब – हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी मात्र या विधेयकाविरुद्ध आपलं आंदोलन तीव्र केलंय. अनेक शेतकरी संघटना आज रस्त्यावर उतरलेल्या दिसत आहेत. शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी ‘रस्ता रोको’ आंदोलन करत महामार्ग ठप्प करून टाकलेत. शेकडोंच्या संख्येनं शेतकरी अंबालाच्या रस्त्यांवर उतरलेले दिसत आहेत. ट्रॅक्टरसहीत रस्त्यावर आलेल्या या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केलीय. अनेक आंदोलनकर्त्यांनी झेंडे आणि बॅनर दाखवत सरकारच्या धोरणाचा विरोध केलाय.

  • आंदोलनकर्त्यांनी हे महामार्ग ठप्प केलेत
  • फतेहाबाद – सिरसा राष्ट्रीय महामार्ग ठप्प
  • अंबाला – चंदीगड राष्ट्रीय महामार्ग ठप्प
  • बरवालात पंचकुला – यमुनानगर राष्ट्रीय महामार्ग ठप्प

पंजाबहून मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी दिल्लीकडे आपली वाटचाल सुरू केलीय. या शेतकऱ्यांना हरियाणातल्या अनेक संघटनांचं समर्थन आणि पाठबळ मिळालंय. त्यामुळे पोलिसांनाही अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंबाला सीमेपासून राजधानी दिल्लीपर्यंत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.

पंजाबमध्ये मोहालीजवळ जीरकपूरमध्ये राष्ट्रीय महामार्गाजवळ मोठ्या संख्येत शेतकरी एकत्र जमले. कृषि विषयक विधेयकाविरोधात चंदीगड ते दिल्लीपर्यंत ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या तयारीत हे शेतकरी आहेत. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून करनाल हायवे ब्लॉक करण्यात आलाय. शेतकरी दिल्ली – अंबाला – चंदीगड महामार्ग रोखण्याच्या तयारीत आहेत.

हरियाणात अंबाला रेंजचे आयजी वाय. पूरन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील १६-१७ शेतकरी संघटनांनी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं म्हटलंय. परंतु, कायदे – व्यवस्था कोणत्याही परिस्थितीत बिघडू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

 

News English Summary: Thousands of farmers have blocked most of the national and state highways including NH 344 also known as Ambala-Roorkee national highway near Milk Majra village of Yamunanagar district in Haryana to oppose the farm reform bills under consideration in the Parliament .

News English Title: Farmers protest against agricultural bill in Punjab Haryana police on alert Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x