आत्महत्येच्या प्रयत्नातून शेतकरी बचावला | म्हणाला बरेवाईट झाल्यास मोदी-शहांवर गुन्हे नोंदवा

नवी दिल्ली, २१ डिसेंबर: मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आलेल्या एका शेतकऱ्याने काल पंजाबला गेल्यानंतर आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा शेतकरी 2 दिवसांपूर्वीच दिल्लीतील आंदोलनातून परत पंजाबला आपल्या घरी आला होता. मृत 22 वर्षीय शेतकऱ्याचं नाव गुरलाभ सिंग असं आहे. तो बठिंडा जिल्ह्यातील दयालपुरा मिर्जा या गावातील रहिवासी होता. तो 18 डिसेंबरला आंदोलनावरुन परतला होता.
तरुण शेतकरी गुरलाभने शनिवारी (19 डिसेंबर) आपल्या घरी विषारी पदार्थ खाऊन आपली जीवनयात्रा संपवली. विष खाल्ल्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गुरलाभवर 6 लाख रुपयांचं कर्ज असल्याचंही सांगितलं जातंय. असं असलं तरी त्याच्या आत्महत्येचं निश्चित कारण अद्याप समजलेलं नाही.
त्यानंतर आज पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील ६५ वर्षीय शेतकरी निरंजन सिंग यांनी सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सिंघू सीमा कोंडली इथं आंदोलन करणार्या हजारो शेतकऱ्यांपैकी निरंजन सिंग हे एक आहेत. निरंजन यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांना प्रथम पानीपतच्या रुग्णालयात आणि त्यानंतर रोहतकमधील पीजीआय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Niranjan Singh, a 65-year-old farmer from Tarn Taran district in Punjab, tried to commit suicide by consuming poison on Monday).
त्यानंतर त्यांनी व्यक्त होताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ‘मला आता बरं वाटतंय. पण शेतकरी आत्महत्येसारख्या घटना घडतील तेव्हा कदाचित सरकार जागे होईल. एखादी व्यक्ती आत्महत्या करते तेव्हा त्याला प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलीस गुन्हा दाखल करतात. माझ्या प्रकरणात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा. शेतकरीच जगणार नसेल तर दुसरे कोणी कसे जिवंत राहतील?’, असं निरंजन सिंग म्हणाले.
News English Summary: Niranjan Singh, a 65-year-old farmer from Tarn Taran district in Punjab, tried to commit suicide by consuming poison on Monday. Niranjan Singh is one of the thousands of farmers protesting at Singhu Seema Kondli. After Niranjan ingested the poison, he was rushed to a hospital in Panipat and later to a PGI hospital in Rohtak. There his health is stable.
News English Title: Farmers protest farmer trying to commit suicide angry over PM Narendra Modi and Amit Shah news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL