16 April 2025 6:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

निर्मला सीतारमन म्हणतील की ICU, व्हेन्टिलेटर्स आणि ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू हे ‘अॅक्ट ऑफ गॉड’ आहेत - काँग्रेस

Congress leader Srivatsa

नवी दिल्ली, २३ एप्रिल: देशात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.

देशात सध्या रुग्णसंख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी ३४ लाख ५४ हजार ८८० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत झालेल्या २१०४ मृत्यूनंतर एकूण मृतांची संख्या १ लाख ८४ हजार ६५७ वर पोहोचली आहे. देशात सध्याच्या घडीला २२ लाख ९१ हजार ४२८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत देशभरात १३ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ जणांचं लसीकरण झालं आहे.

दरम्यान, कोरोनाची आपत्ती ही ‘अॅक्ट ऑफ गॉड’ असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असं सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे गुरुवारी जणू कबूल केलं होतं. तसंच केंद्रानं राज्यांना पर्यायही दिले होते. निर्मला सीतारामन यांच्या या वक्तव्यानंतर अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

आता काँग्रेस नेते श्रीवत्सा यांनी सध्याच्या घडामोडींवरून निर्माण सीतारमन यांच्या विधानाची पुन्हा आठवण करून दिली आहे. यासंदर्भात ट्विट करताना श्रीवत्सा यांनी म्हटलंय की, “आज पासून काही महिन्यांनी निर्मला सीतारमन नक्कीच म्हणतील की ICU, व्हेन्टिलेटर्स आणि ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू हे ‘अॅक्ट ऑफ गॉड’ आहेत.

 

News English Summary: Few months from now union finance minister Nirmala Sitharaman will surely say that deaths due to lack of ICU Ventilators and Oxygen supply was an ACT OF GOD said congress leader Srivatsa news updates.

News English Title: Few months from now Nirmala Sitharaman will surely say that deaths due to lack of ICU Ventilators and Oxygen supply was an ACT OF GOD said congress leader Srivatsa news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या