22 January 2025 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

अग्नितांडव! | गुजरातमध्ये कोविड इस्पितळाला आग, १६ रुग्णांचा होरपळून मृत्यू

Patel welfare Covid hospital

भरूच, १ मे | महाराष्ट्रामध्ये भंडारा, भांडुप, नालासोपारा, नागपूर याठिकाणी रुग्णालयांना लागलेल्या आगीच्या घटना ताज्या असतानाच आता गुजरातमधून देखील आगीची घटना समोर येते आहे. भरुच याठिकाणी हे अग्नितांडव घडलं असून यात 16 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

गुजरातमधील भरुच याठिकाणी असणाऱ्या पटले वेलफेअप हॉस्पिटल (Patel Welfare Hospital) मध्ये रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही आगीची घटना घडली. याठिकाणी कोव्हिड सेंटर बनवण्यात आलं आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं होतं, त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी या घटनेमध्ये चौदा जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

आगीमुळे रुग्णालय व परिसरातील वीज बंद पडली. यामुळे बचावकार्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या. बर्‍याच प्रयत्नांनंतर रुग्णांना बाहेर काढले गेले व दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात आले. नवीन रुग्ण आल्यावर बराच काळ बेड्स आणि ऑक्सिजनसाठी प्रतिक्षा करत होते.

भरुचचे एसपी राजेंद्र सिंह चुडासमा यांनी अशी माहिती दिली आहे की अतिदक्षता विभागात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं होतं. पण जोपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवलं जात होतं, तोपर्यंत बारा जणांनी आपले प्राण गमावले होते. त्यानंतर आणखी 4 जणांनी अखेरचा श्वास घेतला.

 

News English Summary: The fire broke out at Patel Welfare Hospital in Bharuch, Gujarat, around midnight. A coveted center has been set up here. The fire brigade had reached the spot as soon as they got the information about the fire. Although they managed to control the fire, fourteen people have lost their lives in the incident.

News English Title: Fire at Patel welfare Covid hospital in Bharuch Gujarat at midnight 16 people died news updates.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x