Corona Vaccine Updates | पहिली स्वदेशी कोरोना लस मिळणार 'या’ तारखेला
मुंबई, २५ ऑक्टोबर: कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पसरत असलेल्या कोव्हिड19 च्या फैलावाला प्रतिबंध घालण्यासाठी जगभर विविध ठिकाणी लसींबाबत संशोधन सुरु असून भारतात भारत बायोटेक ही कंपनीही प्राधान्याने ही लस तयार करण्याच्या प्रयत्नांत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार सर्वात निर्धोक आणि पूर्णता: भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस वर्ष 2021 च्या जून महिन्यापर्यंत बाजारात येऊ शकेल. नुकतीच या कंपनीच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मिळाली असून तिसऱ्या टप्प्यातील चाचणी येत्या नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे.
कोरोनाचा विळखा जनगभरात वाढत आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण अजूनही दररोज 50 हजारहून अधिक वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाची लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. ऑक्सफर्ड आणि सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या लसीची चाचणी देखील सध्या तिसऱ्या टप्प्यात सुरू आहेत. हैदराबादस्थित भारत बायोटेक या कंपनीने 2 ऑक्टोबर रोजी डीसीजीआयकडे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर या कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. 12 ते 14 राज्यातील 20 हजारहून अधिक नागरिकांवर या लशीची चाचणी होणार आहे. मार्च अखेरपर्यंत या लसीचे सर्व परिणामांची माहिती मिळू शकते त्यामुळे जूनपर्यंत ही लस उपलब्ध करून देता येऊ शकते असं भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने दावा केला आहे.
कोरोना लसीच्या निर्मितीमधील मोठा भाग हा भारतात तयार होण्याची शक्यता असल्याचं बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रमुख मार्क सुजमन यांनी सांगितलं होतं. भारत लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत असून पुढील वर्षापर्यंत एखादी लस बाजारात येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मजबूत खासगी क्षेत्रामुळे हे शक्य असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशातील करोना संसर्गाचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसत असले, तरी देखील नवीन करोनाबाधित अद्यापही मोठ्या संख्येने आढळत आहेत. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडतच आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ५० हजार १२९ नवे करोनाबाधित आढळले असून, ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख ६४ हजार ८११ वर पोहचली आहे.
देशभरातील एकूण ७८ लाख ६४ हजार ८११ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ६८ हजार १५४ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७० लाख ७८ हजार १२३ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख १८ हजार ५३४ जणांच्या संख्येचा समावेश आहे. २४ ऑक्टोबर पर्यंत देशात १०,२५,२३,४६९ नमूने तपासण्यात आले आहेत. तर, यातील ११ लाख ४० हजार ९०५ नमून्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.
News English Summary: Research on vaccines is underway in various parts of the world to curb the spread of Covid 19 due to the outbreak of Corona virus, and India Biotech in India is also working on the vaccine. According to the company, the safest and most complete: Indian-made COVAXIN vaccine is expected to hit the market by June 2021. The company’s vaccine has recently been approved for a third phase of testing, with testing expected to begin in November.
News English Title: First indigenous corona vaccine will available in June 2020 News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम