5 November 2024 7:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

RSS मुलांना देणार लष्करी प्रशिक्षण, लवकरचं सैनिकी स्कूल स्थापन करणार

RSS, Rashtriya Swayamsevak Sangh, Army, Army School, Mohan Bhagwat

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता स्वयंसेवकांना लष्करी प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी यूपीत येथे सैनिकी स्कूल उघडणार आहे. यामध्ये मुलांना लष्करात अधिकारी बनवण्यासाठीच प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या शाळेच्या संचालनाची जबाबदारी आसएसएसच्या विद्या भारतीकडे दिली जाणार आहे. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.

RSS कडून नेहमी राष्ट्रहितासाठी आणि हिंदू संस्कृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळे आता लष्करी बळ वाढविण्यासाठी आणि लष्करात जाण्यास इच्छुक असणाऱ्या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी संघ आता सैनिकी स्कूल उघणार आहे. RSSचे सरसंघचालक राजेंद्र सिंह ऊर्फ रज्जू भय्या यांच्या नावावरून या शाळेचं नाव रज्जू भैय्या सैनिक विद्यामंदिर ठेवण्यात येणार आहे. शाळेची स्थापना उत्तर प्रदेश बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूरमध्ये केली जाणार आहे.

रिपोर्टनुसार, शाळेच्या निर्माणाचं कार्य सुरू करण्यात आंल आहे. ही एक होस्टल प्रकारातली शाळा असून, इथे सैनिकी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये या शाळेत शिक्षणाचे धडे शिकवले जाणार आहेत. या शाळेत सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून, इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थ्यांना इथे शिक्षण घेता येणार आहे. आरएसएसचा हा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यास देशातल्या दुसऱ्या राज्यांतही अशा प्रकारच्या शाळा उघडल्या जाणार आहेत.

हॅशटॅग्स

#Mohan Bhagwat(8)#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x