28 January 2025 7:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

महिन्याला ३०० युनिट वीज मोफत, विद्यार्थ्यांना नर्सरी ते PHD'पर्यंत मोफत शिक्षण: काँग्रेस

Delhi Assembly Election 2020, CM Arvind Kejariwal, Congress manifesto

नवी दिल्ली: काँग्रेसने आज दिल्लीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये सत्तेत आल्यानंतर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. तसेच स्वस्तामध्ये जेवण उपलब्ध करण्यासाठी १०० इंदिरा कॅन्टीन सुरू करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय काँग्रेस लाडली योजना पुन्हा सुरू करणार आहे. विद्यार्थ्यांना नर्सरी ते पीएचडीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचे वचन दिले आहे. महिला सुरक्षा, शिक्षण, वीज आणि पाण्याचा पुरवठा, रोजगार आणि दलित आदिवासींच्या कल्याणासाठी २० मुद्दे मांडण्यात आले आहेत.

लहान मुलांना खेळण्यासाठी एक रुपयांत मैदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या जाहीरनाम्यातील महत्वाची घोषणा म्हणजे बेरोजगारांना भत्ता देण्यात येणार आहे. पदवीधारकांसाठी ५ हजार रुपये तर पदव्युत्तरांसाठी ७५०० रुपये बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.

तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आपले संकल्प पत्र प्रसिद्ध केलं होतं. राष्ट्रीय राजधानीत पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना २ रुपये किलो दराने गव्हाचे पीठ देण्यात येईल, असे भारतीय जनता पक्षाने यात वचन दिले आहे. त्याचबरोबर ईटीडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांना ‘बेटी बचाव योजनें’तर्गत सायकल आणि ई-स्कूटी वाटप करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. इतकेच नव्हे तर दिल्लीत सरकार स्थापल्यानंतर १० नवीन महाविद्यालये सुरू करण्याचे आश्वासनही भारतीय जनता पक्षाने आपल्या संकल्प पत्रात दिले आहे. भारतीय जनता पक्षाने १० नवी आश्वासने या संकल्प पत्रात दिली आहेत.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार मनोज तिवारी यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. गेल्या ३ वर्षात सीलिंग कायद्यामुळे व्यापाऱ्यांतचे कंबरडे मोडले. त्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आहे. सीलिंग समस्या सोडवू, कायद्यात बदल करू असे भारतीय जनता पक्षाने जाहीरनाम्यात म्हटले आहे. दिल्ली देशाचे हृदय आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत आम आदमी पार्टीला टक्कर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रयत्न केले आहेत. मात्र, दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाच जास्त पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुन्हा केजरीवाल यांचे सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता भारतीय जनता पक्षानेही जनतेला आकर्षित करण्यासाठी काही मोफत देण्याची घोषणा आपल्या संकल्प पत्रात केली आहे. त्यामुळे दिल्लीतील मतदार आता भाजपकडे आकर्षित होणार का, याचीच उत्सुकता आहे.

 

Web Title:  Five Thousand Rupees unemployment allowance graduates Rupees 7500 postgraduates manifesto of congress before Delhi Assembly Election 2020.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x