19 April 2025 8:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

भाजपचं स्वप्नं पूर्ण झालं, देश 'राम मय' होऊन सर्वत्र 'राम नाम सत्य है' आवाज येत आहेत - माजी वायुदल अधिकारी

Former IAF Anuma Acharya

नवी दिल्ली, २४ एप्रिल: देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते.

मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी देशात विक्रमी 3 लाख 44 हजार 949 नवीन रुग्ण आढळले. गेल्यावर्षीपासून आतापर्यंत एखाद्या देशात एका दिवसात नवीन रुग्ण मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी 2,620 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला. एका दिवसात झालेल्या मृतांचा हा नवीन विक्रम आहे. देशात कोरोनाचे आकडे हे झपाट्याने वाढताना दिसत आहेत. मात्र लोकसंख्येच्या हिशोबाने भारत सध्या चांगल्या स्थितीत आहे. या प्रकरणात आपण जगात 119 व्या क्रमांकावर आहे. जेथे सर्वात जास्त प्रकरणे येत आहेत.

दुसरीकडे अमेरिकेच्या प्रसिद्ध इन्स्टिट्यूटने चालू वर्षात भारतात करोना मृत्यूसंख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. १० मे रोजी भारतात ५ हजार ६०० जणांचा करोनामुळे मृत्यूची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, १२ एप्रिल ते १ ऑगस्ट या कालावधीत देशात ३ लाख २९ हजार जणांचा करोनामुळे मृत्यू होऊ शकतो. तसेच जुलै अखेरीपर्यंत एकूण ६ लाख ६५ हजार मृत्यू होऊ शकतात, असंही इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासात म्हटलं आहे.

एकाबाजूला संपूर्ण देशभरात मृत्यूचं तांडव सुरु असताना दुसरीकडे कोरोना संबंधित औषधं आणि साधनांचा तुटवडा आहे. याच विषयाला अनुसरून माजी वायुदल अधिकारी अनुमा आचार्य यांनी मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे. अनुमा आचार्य यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “भाजपचं स्वप्नं पूर्ण झालं, देश ‘राम मय’ होऊन सर्वत्र ‘राम नाम सत्य है’ आवाज येत आहेत”.

 

News English Summary: number of new corona patients being found is steadily increasing. On Friday, a record 3 lakh 44 thousand 949 new patients were found in the country. This is the highest number of new patients received in a single day in a country since last year. As many as 2,620 people died of the infection on Friday. This is a new record of deaths in a single day.

News English Title: Former Airforce officer Anuma Acharya slams Modi govt over current corona pandemic in India news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या