21 April 2025 10:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

माजी सरन्यायाधीश म्हणाले | देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे | तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही

Former Chief Justice, Rajya Sabha MP Ranjan Gogoi, Indian Judiciary

नवी दिल्ली, १४ फेब्रुवारी: माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी न्यायपालिकेवर टीका केली आहे. जर कोणी भारतीय न्यायालयात गेला तर त्यांना निकालासाठी सतत प्रतीक्षा करावी लागेल. देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे. मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात जाणार नाही. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही, असं स्पष्ट मत रंजन गोगोई यांनी इंडिया टुडे या वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मांडलं आहे.

यावेळी रंजन गोगोई म्हणाले की, घटनात्मक संस्था म्हणून न्यायपालिका किती महत्त्वाची आहे, यावर जोर देण्याची गरज नाही. तुम्हाला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था हवी आहे, परंतु इकडे तुमची न्यायव्यवस्था उध्वस्त झाली आहे.

उच्च न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांच्या आकडेवारीत सुमारे तीन लाखांची वाढ झाली आहे आणि सुप्रीम कोर्टाने मागील वर्षी 6,000-7,000 नवीन प्रकरणे दाखल केली आहेत. यावरून असे दिसून येते की, न्यायालयांमध्ये सुमारे 4 कोटी खटले प्रलंबित आहेत, उच्च न्यायालयांमध्ये 44 लाखांपेक्षा जास्त खटले आणि सर्वोच्च न्यायालयात सुमारे 70,000 खटले प्रलंबित आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत गोगोई यांच्यावर केलेल्या टिकेवर, त्याबाबतच्या कारवाईवर बोलताना गोगोई म्हणाले की, “त्या महिला खासदाराला या प्रकरणातील योग्य गोष्टी ठाऊक नाहीत. त्यावेळी ते प्रकरण मी न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्याकडे दिले होते. त्यांनी चौकशी समिती नेमली होती. मोठय़ा कंपन्यांना न्यायालयात जाऊन संधी घेणे परवडते, इतरांना नाही. कारण जर तुम्ही न्यायालयात गेलात तर तुम्ही तुमचेच मळलेले कपडे धूत बसता. तुम्हाला न्याय मिळत नाही.”

 

News English Summary: Former Chief Justice and Rajya Sabha MP Ranjan Gogoi has criticised the judiciary. If anyone goes to an Indian court, they will have to wait for a verdict. The country’s judiciary is outdated. I will not go to court for anything. You don’t get justice there, said Ranjan Gogoi in a program organized by India Today.

News English Title: Former Chief Justice and Rajya Sabha MP Ranjan Gogoi has criticised the judiciary news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या