15 January 2025 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

विकास दुबे आणि सरकारचे हितसंबंध उघड होण्याच्या भीतीने गाडी पलटवली - अखिलेश यादव

Former CM Akhilesh Yadav, Yogi Government, Gangster Vikas Dubey, encounter News

कानपूर, १० जुलै : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र थोड्या वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या चकमकीत ४ पोलिसही जखमी झाल्याचे समजते आहे.

आज सकाळी ७.१५ ते ७.३५ च्या दरम्यान उत्तर प्रदेशची एसटीएफ टीमसोबत झालेल्या झटापटीत मारला गेला. विकास दुबेने पोलिसांची बंदुक घेण्याच्या प्रयत्न केला. या झटापटीत एका गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामध्ये तो मारला गेला. काहीजणांच्या म्हणण्यानुसार एन्काऊंटर हा एक बनाव आहे. पोलीस आणि एसटीएफची टीम १० जुलै रोजी दुबेला घेऊन कानपूरला निघाली होती. कानपुर नगरच्या पोलिसांमध्ये आणि दुबेमध्ये झटापट झाली. यामध्ये गाडीचा अपघात झाला. दुबे पळून जाताना एन्काऊंटरमध्ये मारला गेला.

कानपुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबेने पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पळून जाणाऱ्या विकास दुबेला आत्मसमर्पणाचा सल्ला दिला. पण त्याने ते ऐकलं नाही. त्यावेळी एन्काऊंटरदरम्यान विकास दुबे जखमी झाला. त्याला उपचारा करता रूग्णालयात नेण्यात आलं. उपचारा दरम्यान विकास दुबेचा मृत्यू झाला. कानपूर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. मात्र याबाबत पोलीस अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत.

मात्र विरोधकांनी या प्रकरणावरून योगी सरकारच्या हेतूवर संशय व्यक्त केला आहे. विकास दुबे आणि सरकारमधील अधिकारी तसेच राजकीय नेत्यांचे हितसंबंध होते आणि ते उघड होण्याच्या भीतीने सरकार पलटू नये म्हणून गाडी पलटविण्यात आली असा आरोप माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर केला आहे.

 

News English Summary: He was killed in a scuffle with the Uttar Pradesh STF team between 7.15 am and 7.35 am this morning. Vikas Dubey tried to grab a police gun. He lost control of his vehicle and was killed during the ambush. According to some, the encounter is a hoax.

News English Title: Former CM Akhilesh Yadav slams Yogi Government over Gangster Vikas Dubey encounter News latest Updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x