23 December 2024 11:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस
x

फडणवीस यांची थेट केंद्रीय अर्थमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता - सविस्तर वृत्त

Former CM Devendra Fadnavis, Union Finance Minister

नवी दिल्ली: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेवर पाठवून त्यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्रीपदाची जबाबदारी द्यावी, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असून, याबाबत दिल्लीत एक बैठक झाल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. त्यात राज्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळून येण्याच्या शक्यतेने भाजपच्या वरिष्ठांनी हे पाऊल उचलून अनेक गोष्टी म्यान केल्याचे समजते.

दरम्यान राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जरी काही नेत्यामध्ये नाराजी असली तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील म्हणून ते दिल्लीत परिचित आहेत आणि त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रात एकतर्फी कारभार चालवून सर्वच भाजप नेत्यांना शक्तिहीन केलं होतं. दुसरं म्हणजे २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांनी नितीन गडकरी यांना देखील शह देण्याची योजना आखली आहे आणि कारण केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यामध्ये फारसे पटत नाही आणि गडकरींचे संघात चांगले संबंध असल्याने मोदी-शहा जोडीचे जास्त काही चालत नाही.

त्यामुले देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात आणून त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देऊन गडकरींचे महत्व कमी करून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला सिरारामन यांच्याबाबतही मोदींचे मत फारसे चांगले नसल्याने त्यांना केरळची जबाबदारी देऊन त्यांच्याकडील वित्त खाते फडणवीस यांच्याकडे देण्याबाबत प्राथमिक चर्चा देखील झाल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात सर्वाधिक १०५ जागा जिंकून देखील भारतीय जनता पक्ष सत्तेबाहेरच राहिल्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्यात कोंडी झाल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. सत्तास्थापनेच्या गोंधळामध्ये शिवसेनेकडून सातत्याने टार्गेट केले गेलेले देवेंद्र फडणवीस यांना आधीपासून असलेले एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता यांच्यासारखे पक्षांतर्गत विरोधक देखील आता त्यांच्याविरोधात उभे राहिल्याचं पाहायला मिळालं आहे.

राज्यात शिवसेनेच्या मदतीने आता सरकार स्थापन करणे शक्य नसल्याने फडणवीस यांचा केंद्रात उपयोग करून घ्यावा, असे भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींचे मत आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात नेण्याचा विचार केंद्रीय भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या ७ सदस्यांचा कार्यकाळ संपत असून त्याजागी राज्यातून कुणाला पाठवायचं, याची खलबतं सर्वपक्षीय पातळीवर होऊ लागली आहेत. या सातपैकी भारतीय जनता पक्षाकडून ३ जण विजयी होतील अशी गणितं जुळून आली आहेत.

दरम्यान, राज्यसभेवरील सात जागांसाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीचे ४ तर भाजपचे ३ जण सहजपणे विजयी होतील, असे दिसते. दोन जागा मिळाव्यात, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असून, त्यासाठी शिवसेनेशी बोलणी सुरू आहेत. काँग्रेसचा एकच उमेदवार निवडून येईल. निवडून येणाऱ्या ७ जणांमध्ये शरद पवार हे निश्चितच असतील. दुसऱ्या जागेसाठी यशस्वी प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादीचे माजिद मेमन यांना उमेदवारी मिळू शकेल.

 

Web Title:  Former CM Devendra Fadnavis could be next Union Finance minister.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x