29 April 2025 3:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

Former Cm Of Chhattisgarh, Ajit Jogi Passed Away, Amit Jogi

रायपूर २९ मे: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं प्रदीर्घ आजाराने आज निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रायपूरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ९ मे रोजी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळतच गेली. काही दिवसानंतर त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. नंतर ते कोमात गेले होते. आज त्यांना पुन्हा ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

राजकारणात येण्यापूर्वी अजित जोगी यांनी सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण केली होती. तसंच ते तहसीलदार या पदावर कार्यरत होते. १९८८ च्या जवळपास त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती येण्यापूर्वी त्यांनी खासदार म्हणूनही काम केलं आहे. छत्तीसगढच्या निर्मितीनंतर त्यांनी २०००- २००३ या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली होती. २०१६ मध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी जनता काँग्रेस छत्तीसगढ असा आपला पक्ष स्थापन केला होता.

 

News English Summary: Former Chief Minister of Chhattisgarh Ajit Jogi passed away today due to a long illness. He was 74 years old. He was admitted to a hospital in Raipur after suffering a heart attack. Today he had another heart attack and died.

News English Title: Former Cm Of Chhattisgarh Ajit Jogi Passed Away Says Amit Jogi Son Of Ajit Jogi News latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या