27 January 2025 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे
x

राजस्थानचं भाजप मुठीत घेण्याची मोदी-शहांची खेळी वसुंधरा राजेंनी धुळीस मिळवली? - सविस्तर वृत्त

Former CM of Rajasthan Vasundhararaje, Congress, Rajasthan political crisis

जयपूर, १७ जुलै : सध्या भाजपच्या राजस्थानमधील राजकीय खेळीची चर्चा संपूर्ण देशात रंगली आहे. भाजपमधील केंद्रीय पातळीवरील आणि राज्य पातळीवरील नेते मंडळी यामध्ये प्रतिक्रिया देत असले तरी, त्या चर्चेपासून मोदी-शहांनी स्वतःला दूर ठेवलं आहे. जणू राजस्थानात जे घडत आहे त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नसून, जे घडतंय त्यात राजस्थानमधील काँग्रेसमधील अस्वस्थ असलेली नेते मंडळी कारणीभूत आहेत असं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे.

वास्तविक जे घडत आहे त्याची योजनाच मुळात मोदी-शहांनी आखल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. मात्र आपत्ती काळात टीका होण्याच्या भीतीने त्यांनी स्वतःला यापासून दूर ठेवल्याचं म्हटलं जातं. वास्तविक राजस्थानमधील भाजपवर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचं एकहाती वर्चस्व आहे आणि त्यांना दुसरा प्रतिस्पर्धी देखील नाही. तिकडे मोदी-शहांच्या नव्हे तर वसुंधरा राजेंचा शब्द अखेरचा समाजला जातो हे भाजपमधील वास्तव आहे.

मात्र मोदी-शहा जोडीने राजस्थानमधील सरकार उलटून लावताना यामध्ये वसुंधरा राजेंना कोणतीही कल्पना दिली नाही आणि त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवलं होतं. राजस्थान काँग्रेसमधील महत्वाचे तरुण नेते सचिन पायलट यांना हाताशी धरून मागील काही महिन्यापासून राजस्थान सरकार पाडण्याची प्रक्रिया सुरु होती, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. सदर योजना राबवताना मोदी-शहा जोडीने वसुंधरा राजेंना प्रतिस्पर्धी म्हणून सचिन पायलट यांनी मोठं करण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न केल्याचं म्हटलं जातंय आणि नेमकी तीच मोदी-शहांची जोडीची खेळी वसुंधरा राजे यांनी वेळीच ओळखली आणि शांत राहून संपूर्ण खेळ पलटवल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

मोदी-शहा यांना राजस्थानमध्ये केवळ भाजपचं सरकार नको होतं, तर त्यासोबत वसुंधरा राजेंना शह देऊन स्वतःकडे संपूर्ण राज्याची सूत्र घेण्याची योजना आखली होती. आजही माजी मुख्यमंत्री असलेल्या वसुंधरा राजे गप्प आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या सुंदोपसुंदीवर वसुंधरा राजेंकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष म्हणजे बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत त्या उपस्थित राहिल्या नाहीत.

राजस्थान कॉंग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आलेला असताना वसुंधरा राजे यांच्या शांत राहण्यानं भाजपामध्ये सगळंच सुरळीत सुरू आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण काँग्रेस सरकारमध्ये तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथुर, गुलाबचंद कटारिया यांच्यासह अनेक दिग्गज नेते गेहलोत सरकारवर हल्लाबोल करत आहेत. विशेष म्हणजे वसुंधरा राजे या संपूर्ण प्रकरणापासून अंतर राखून आहेत.

सचिन पायलट यांना पक्षात घेण्यासाठी ज्या पद्धतीने भाजपाचे नेते प्रयत्नशील दिसत होते, परंतु वसुंधरा राजे यासाठी तयार नसल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण राजस्थान भाजपावर राजे यांचे वर्चस्व आणि प्रभुत्व आहे. त्यांना नाराज करणं हे भाजपालाही परवडण्यासारखं नाही. हेच कारण आहे की, राजस्थान भाजपात घेण्यापूर्वी हायकमांड पुन्हा बॅकफूटवर गेलं आहे. त्यामुळेच भाजपाची स्थिती सध्या वेट अँड वॉचसारखी आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या अशोक गेहलोत यांचे अल्पमतात आलेले सरकार वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचा आरोप एनडीएच्याच सहयोगी पक्षाचे नागौर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हुनमान बेनीवाल यांनी केला आहे.

 

News English Summary: In fact, the BJP in Rajasthan is dominated by former Chief Minister Vasundhara Raje and has no other rival. The reality in the BJP is that the word of Vasundhara Raje, not Modi-Shah, is the last word in the society.

News English Title: Former CM of Rajasthan Vasundhararaje made it happened for congress during Rajasthan political crisis News Latest Updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x