23 February 2025 12:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

ते दिल्ली बिल्ली तुमची लायकी नाही | कधी एक तरी निवडणूक लढऊन दाखवा - निलेश राणे

Former MP Nilesh Rane, Shiv Sena MP Sanjay Raut, Contest the elections

मुंबई, १७ ऑगस्ट : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे हे सुरुवातीपासूनच शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेत आलेले आहेत. त्यातच राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर राणे यांच्या शिवसेना विरोधाला आणखीनच धार आली आहे. नुकताच निलेश राणे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र तरीही ट्विटरच्या माध्यमातून सेना नेत्यांना लक्ष्य करायला ते विसरले नाहीत.

राष्ट्रातील संकटकाळात आम्हीच आमचे निर्णय घेऊ, जगाने नाक खुपसू नये असे बेदरकारपणे वागणाऱ्या रशियाचा आदर्श आमचे राजकारणी ठेवणार नाहीत. आजही ते अमेरिकेच्या प्रेमात पागल झाले आहेत. रशियाने बनवलेली ‘लस’ बेकायदेशीर ठरवण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू झाले आहेत, पण रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ही लस सर्वप्रथम आपल्या तरुण मुलींनाच टोचली व आपल्या देशात आत्मविश्वास निर्माण केला. आत्मनिर्भरतेचा हा पहिला धडा रशियाने घालून दिला. आपण आत्मनिर्भरतेवर प्रवचनेच झोडत बसलो आहोत असा चिमटा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काढला होता.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून रोखठोक या सदरात मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘तिकडे रशियाने कोरोनाची लस काढली. WHO लाही विचारले नाही. आम्ही मात्र आमच्याच मस्तीत आहोत,’ अशी टीका राऊत यांनी केली. राऊत यांच्या टीकेवर भाजपकडून माजी खासदार निलेश राणे यांनी हल्लबोल केला आहे.

संजय राऊत यांच्या विधानावर निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, संज्या ते दिल्ली बिल्ली तुझी लायकी नाही ते सोड तू कधी तरी एक तरी निवडणूक लढऊन दाखव. एक मुंबई शहर नाही सांभाळता येत आणि वार्ता देशाच्या, असं निलेश राणे यांनी सांगितले.

 

 

News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut had attacked the Modi government in the name of cash from ‘Saamana’. There, Russia vaccinated Corona. WHO did not ask. However, we are in our best mood, ‘said Raut. Former BJP MP Nilesh Rane has lashed out at Raut’s remarks.

News English Title: Former MP Nilesh Rane has challenged Shiv Sena MP Sanjay Raut to contest the elections News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x