27 December 2024 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर ब्रेकआऊट देणार. तज्ज्ञांनी दिले तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टॉप लेव्हलवरून 25% घसरला, आता 100 रुपयांच्या पार जाणार - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: NBCC Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, यापूर्वी 5121% परतावा दिला - BSE: 512008 Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Gold Rate Today | बापरे, लग्नसराईच्या हंगामात आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय

Former PM Manmohan Singh, Rahul Gandhi, congress, Happy Birthday

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज ८८ वा वाढदिवस आहे. मनमोहन सिंग शांत आणि साधेपणासाठी ओळखले जातात. केवळ साधेपणाच नाही तर ते भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी देखील ओळखले जातात. यूपीएच्या कार्यकाळात मनमोहन सिंग दोनदा पंतप्रधान राहिले. २००४-१४ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. पंतप्रधान होण्यापूर्वी ते १९९१ मध्ये नरसिंहराव सरकारमधील आर्थिक सुधारणांकरिता परिचित होते.

ते माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे अर्थमंत्री होते. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान होण्यापूर्वीच देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक नवीन आणि मजबूत मार्ग दाखविला. याच कारणामुळे देश त्यांना अर्थशास्त्रज्ञ म्हणून अधिक लक्षात ठेवतो. तर मग आम्ही आपणास आज माजी पंतप्रधानांच्या वाढदिवशी संबंधित खास गोष्टी सांगत आहोत. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी फाळणीपूर्वी भारताच्या पंजाब प्रांतात झाला. जो आता पाकिस्तानचा भाग आहे. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठातून अभ्यास करतानाच ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेटचे शिक्षण घेतले.

दरम्यान राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि काँग्रेसच्या सर्व मंडळींनी मनमोहन सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशाला त्यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत असल्याचं देखील म्हटलं आहे.

भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, सभ्यता आणि समर्पण आम्हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. एक अर्थशास्त्रज्ञ, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, देशाचे वित्तमंत्री आणि पंतप्रधान म्हणून डॉ. सिंग यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे.

 

News English Summary: India feels the absence of a prime minister with the “depth” of Dr Manmohan Singh, said Congress leader Rahul Gandhi as he wished the former Prime Minister on his 88th birthday today. Rahul Gandhi, who was one of the first to wish Dr Singh, also praised him for his “honesty, decency and dedication”, which, he said, was an inspiration to others.

News English Title: Former PM Manmohan Singh turns 88 today Rahul Gandhi congress leaders wish Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Manmohan Singh(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x