23 February 2025 2:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

१९७१'च्या युद्धापूर्वी इंदिरा गांधीच्या लेह भेटीत लष्कराला संबोधन, तर मोदींचा धावता दौरा

Former Prime Minister Indira Gandhi, Indian Army

लेह, ३ जुलै : गलवान खोऱ्यातील भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहमध्ये दाखल झाले. सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी याठिकाणी आल्याचे सांगितले जात आहे. सरलष्करप्रमुख बिपीन रावत हेदेखील मोदींसोबत लेहमध्ये आले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत जखमी झालेल्या भारतीय जवानांचीही भेट घेणार आहेत. लेहमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी वायूदल, पायदळ आणि इंडो-तिबेट सीमा दलातील (ITBP) सैनिकांची भेट घेतल्याचे समजते.

दरम्यान, या भेटीनंतर समाज माध्यमांवर भाजपसमर्थक आणि नेते मंडळींनी मोदींचा जयजयकार करत यापूर्वी एकही पंतप्रधानाने असं केलेलं नाही आणि भारतीय लष्कराची काळजी केवळ मोदीच करतात असा समाज माध्यमांवर जोरदार प्रचार सुरु केला आहे. वास्तविक माजी पंतप्रधान नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, राजीव गांधी ते डॉ. मनमोहन सिंग यांनी देखील अशाप्रकारे भेटी घेतल्या आहेत. जेव्हा इंदिरा गांधी लेह भेटीला गेल्या होत्या, त्यानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. इंदिरा गांधींचा हा फोटो १९७१ च्या युद्धापूर्वीचा असून त्यांनी लेह येथे देशाच्या सैन्याला संबोधित केले होते.

मोदींच्या लेह भेटीनंतर भाजप समर्थकांनी समाज माध्यमांवर हौदोस घातल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वी, कोणत्याही पंतप्रधानाने अशा प्रकारे भारतीय लष्कराला भेटी दिलेल्याच नाहीत असा प्रचार सुरु झाला आहे. त्याकाळी समाज माध्यमं नसल्याने या गोष्टी नव्या पिढीसमोर काही आणल्याचं नाही आणि येणार नाहीत याची देखील नियोजनबद्ध काळजी घेतली गेली. मोदींच्या निवडणूक प्रचारातील नवं मतदार सर्वाधिक लक्ष झाले असून, तरुणांसमोर समाज माध्यमांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून चुकीचं चित्रं उभं करण्यात आलं आहे हे नक्की आहे.

 

News English Summary: In fact, former Prime Minister Nehru, Indira Gandhi, Atal Bihari Vajpayee, Rajiv Gandhi to Dr. Manmohan Singh has also made similar visits. When Indira Gandhi visited Leh, Pakistan was torn in two. This photo of Indira Gandhi is from before the 1971 war and she addressed the country’s army in Leh.

News English Title: Former Prime Minister Indira Gandhi and Indian Army meet on China Border News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x