17 April 2025 10:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

सामनात आणीबाणीवरून विरोधकांचा चिरकूट असा उल्लेख; पण उद्धव यांना बाळासाहेबांच्या भूमिकेचा विसर?

Udhav Thackeray, Shivsena

मुंबई : आजच्या सामना संपादकीय मध्ये आणीबाणीवरून मोदींची स्तुती करताना विरोधकांना शेळक्या भाषेत ‘चिरकूट’ असं संबोधण्यात आलं आहे. त्यात आणीबाणीच्या संदर्भात सविस्तर भाष्य करण्यात आलं असलं तत्कालीन परिस्थितीत बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना भेटून आणीबाणीच समर्थन केलं होतं आणि शिवसेनेच्या वाढीसाठी त्याला संधी समजून वेगळीच भूमिका घेतली होती, त्याचा उल्लेख मात्र सामनामध्ये वगळण्यात आला आहे.

इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादून विरोधकांना एकजूट होण्याची संधी दिली. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष विलीन झाले व त्यांनी इंदिरा गांधी यांचा पराभव केला. काँग्रेसने आत्मा चिरडला, पण देशाचा आत्मा मेला नाही. लोकांनी काँग्रेसला धडा शिकवला. देशात इंदिरा गांधींचा, गांधी परिवाराचा, काँग्रेसचा पराभव होऊ शकतो हा विश्वास लोकांत निर्माण करण्याचे काम आणीबाणीने केले ही सकारात्मक बाजू लक्षात घेतली पाहिजे असं सामना संपादकीयमधून सांगण्यात आलं आहे.

तसेच मोदी हे हुकूमशहा आहेत किंवा अप्रत्यक्ष आणीबाणी लादत आहेत हे भय असते तर विरोधकांचे ऐक्य मजबूत व्हायला हवे होते. उलट जे झाले ते फुटले. याचे खापरही काँग्रेसवाले मोदींच्याच माथी मारणार काय? काँग्रेस व इतर चिरकूट विरोधकांनी आत्मचिंतनासाठी केदारनाथच्या गुहेतच जावे. मंथन करावे, चिंतन करावे असा टोलाही शिवसेनेने हाणला.

मात्र १९७५ मधील आणीबाणीच्या काळात सरकारच्या विरोधात बंड करणाऱ्या अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. भाजपमधील तत्कालीन दिग्गज नेते म्हणजे अटलबिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण आडवाणी यांच्यासारख्या नेत्यांना देखील तुरूंगात टाकण्यात आले. मात्र त्याउलट परिस्थितीचा राजकीय फायदा उचलत बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांनी लिहिले, “इंदिराजींना आणीबाणी संदर्भात थेट प्रक्षेपण करावे लागले, कारण त्यावेळी अशांती माजल्याने निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्याचा तो एकमेव पर्याय होता. मनुष्य आणि यंत्र यांच्यात आपल्याला फरक करावा लागेल. अकार्यक्षमतेपासून वाचविण्यासाठी मशीन बंद करणे आवश्यक आहे. जर सरकारी कर्मचारी शिस्त पाळण्यास तयार असतील तर आणीबाणीची परिस्थितीत अशा ठिकाणी विस्तारली जाऊ नये, ज्यामुळे आयुष्याची मशीन खराब होईल. त्यावेळी बाळासाहेबांनी वेगळीच भूमिका घेतली कारण त्यांना चांगलंच ठाऊक होते की, शिवसेनेला या काळात आणखी वाढवण्याची मोठी संधी आहे आणि त्यांच्या त्या भूमिकेमुळे त्यांना अटक देखील झाली नाही. दरम्यान ८० च्या दशकातच शिवसेनेचा मोठ्या प्रमाणावर आवाका वाढू लागला होता.

त्यामुळे सामना संपादकियचा आजचा विषय जरी मोदींची आणीबाणी संदर्भातील भाषणाची स्तुती आणि विरोधकांच्या तत्कालीन भूमिकेवर आगपाखड करण्यासाठी असली तरी उद्धव ठाकरे यांनी यांनी संपादकीयमध्ये बाळासाहेबांच्या तत्कालीन परिस्थितीतील भुमीकेचा मात्र उल्लेख टाळला आहे अन्यथा उद्धव ठाकरेंना तो इतिहासाचं माहित नसावा असंच म्हणावं लागले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या