22 January 2025 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

आरएसएसचे माजी प्रवक्ते आणि तरुण भारतचे माजी मुख्य संपादक मा. गो. वैद्य यांचं निधन

Former spokesperson, RSS M G Vaidya, passes away

नागपूर, १९ डिसेंबर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. मा. गो. वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. 1966 पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारे ’सुगम संघ’ नावाचे हिंदी पुस्तक त्यांनी लिहिले आहे. 1978 साली मा. गो. वैद्य महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यावेळची त्यांची कारकीर्दही उल्लेखनीय राहिली. Former spokesperson of Rashtriya Swayamsevak Sangh M G Vaidya passed away. He was 97 years old.

विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे शनिवार 19 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3.30 वाजता निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्ययात्रा रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांचे राहते घर- 80, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-22 येथून निघेल आणि अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील. Thoughtful journalist, commentator on Hindutva, former editor-in-chief of Tarun Bharat.

मा. गो. वैद्य हे विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे संपूर्ण नाव माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य. त्यांच्या पश्चाेत पत्नी, तीन मुली तसेच पाच मुले असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे मुलगेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत आहेत. त्यापैकी डॉ. मनमोहन हे संघाटे सह सरकार्यवाह, तर श्रीनिवास, शशिभूषण आणि डॉ. राम हे हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक म्हणून काम पाहत आहेत.

 

News English Summary: Former spokesperson of Rashtriya Swayamsevak Sangh M G Vaidya passed away. He was 97 years old. M G Vaidya had held many important positions in the Sangh. While doing journalism for many years from 1966 onwards, Hon. Govt. Vaidya had received many awards for journalism and social service. While at Morris College, M G Vaidya was an active volunteer of the Rashtriya Swayamsevak Sangh.

News English Title: Former spokesperson of RSS M G Vaidya passes away News updates.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x